ETV Bharat / entertainment

महिला दिनी कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी मोठी भेट, 'मेरी ख्रिसमस'चे ओटीटीवर स्ट्रिमिंग सुरू! - मेरी ख्रिसमस ओटीटीवर

Merry Christmas stream on OTT : कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीची मुख्य भूमिका असलेला रोमँटिक, रहस्यमय चित्रपट 'मेरी ख्रिसमस'चे ओटीटीवर स्ट्रिमिंग सुरू झाले आहे. निर्मात्यांनी चाहत्यांसाठी आज आंतरराष्ट्रीय महिला दिनी ही सुखद भेट दिली आहे.

Merry Christmas stream on OTT
मेरी ख्रिसमस ओटीटीवर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 11:30 AM IST

मुंबई - Merry Christmas stream on OTT : कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीची भूमिका असलेला 'मेरी ख्रिसमस' चित्रपट जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रिलीज झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाचे आजपासून नेटफ्लिक्स ओटीटीवर स्ट्रीमिंग सुरू झाले आहे. निर्मात्यांनी याची घोषणा केल्यानंतर कतरिना आणि विजयच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. नेटफ्लिक्सने 'मेरी ख्रिसमस'ची क्लिप शेअर करुन पोस्टला कॅप्शन दिलं, ''या वर्षीचा ख्रिसमस लवकर आला आहे आणि आतापर्यंतचे सर्वात मोठे गिफ्ट उघडण्याची वेळ आली आहे. नेटफ्लिक्सवर मेरी ख्रिसमस येत आहे.'' हा चित्रपट आजपासून 8 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

ही बातमी शेअर होताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. या स्ट्रिमिंगलाही भरपूर यश मिळेल अशी अपेक्षा एका चाहत्यानं व्यक्त केलीय. अनेकांनी याबद्दल निर्मांत्यांना धन्यवाद दिले आहेत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी 'मेरी ख्रिसमस' हे नेटफ्लिक्सवरील सर्वात मोठे आकर्षण असू शकेल.

रोमान्स, गुन्हेगारी आणि भरपूर सस्पेन्सनी भरलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलंय. 1980 च्या काळात आजच्या मुंबई शहराचं नाव बॉम्बे होतं. यामध्ये अल्बर्टच्या भूमिकेत असलेला विजय सेतुपती ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला बॉम्बे शहरात परततो आणि आपली एकाकी आई मारिया ( करिना कैफ ) आणि मुलाला भेटतो. जसजशी रात्र वाढत जाते आणि दोघे एकत्र छान वेळ घालवत असतानाच, मारियाच्या फ्लॅटमध्ये एक मृतदेह सापडल्याने या कथेला रहस्यमय वळण मिळते. हा चित्रपट एकाचवेळी दोन भाषामध्ये चित्रीत करण्यात आला होता.

हिंदी चित्रपटामध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिन्नू आनंद यांच्याही भूमिका आहेत. तर याच भूमिका तमिळ चित्रपटात राधिका सरथकुमार, षण्मुगराजा, केविन जे बाबू आणि राजेश विल्यम्स यांनी साकारल्या होत्या.

हेही वाचा -

  1. राम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
  2. विजय सेतुपती आणि कतरिनाच्या मेरी ख्रिसमसचं नेहा धुपियानं केलं कौतुक
  3. नयनतारानं जुळे मुले आणि पती विग्नेश बरोबरचा फोटो शेअर करुन दिला घटस्फोटाच्या अफवांना पूर्ण विराम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.