ETV Bharat / entertainment

हातात तलवार पकडलेला दिग्दर्शक अनीस बज्मींचा फोटो कार्तिक आर्यननं केला शेअर, दिलं मजेदार कॅप्शन - KARTHIK AARYAN and anees bazmee - KARTHIK AARYAN AND ANEES BAZMEE

Karthik Aaryan: अभिनेता कार्तिक आर्यननं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिग्दर्शक अनीस बज्मी हे हातात तलवार घेऊन बसले आहेत. कार्तिकनं फोटोला मजेदार कॅप्शन दिलं आहे.

Karthik Aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन आणि अनीस बज्मी (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 5:32 PM IST

मुंबई Karthik Aaryan : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच त्यानं सांगितलं की, चित्रपट निर्माता अनीस बज्मीनं त्याच्यावर तलवार ठेवली होती, यामागचं कारण अतिशय मजेशीर आहे. कार्तिकनं त्याच्या अधिकृत इंन्स्टाग्राम स्टोरीजवर अनीस बज्मीचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो तलवार हातात घेऊन बसला आहे. हा फोटो त्याच्या आगामी 'भूल भुलैया 3' या चित्रपटाच्या सेटवरून घेतलेला आहे. अनीस यांच्या हातात तलवार धरण्याचं कारण सांगताना कार्तिकनं गंमतीनं लिहिलं की, "15 तास झाले सर, मला घरी जाऊ द्या."

'भूल भुलैया 3' चित्रपटाबद्दल : कार्तिक अनेकदा 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या सेटवरील काही झलक त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, विद्या बालन, राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा आणि इतर कलाकार देखील आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज, ए ए फिल्म्स आणि सिने वन स्टुडिओ करत आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता कार्तिकचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत.

'भूल भुलैया' फ्रँचायझी : मे महिन्यात, कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या सेटवरून राजपाल यादवबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला होता, यामध्ये हे दोघेही कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' चित्रपटातील 'सत्यानास' गाण्यावर नाचत होते. 'भूल भुलैया 3' हा हॉरर-कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट 'भूल भुलैया'चा तिसरा भाग आहे. 'भूल भुलैया' हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. तसंच शायनी आहुजा, अमिषा पटेल, मनोज जोशी आणि राजपाल यादव यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. 2007 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट प्रियदर्शननं दिग्दर्शित केला होता. दुसरा भाग 2022 मध्ये रिलीज झाला होता, यामध्ये कार्तिकबरोबर कियारा अडवाणी आणि तब्बू हे कलाकार होते. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

हेही वाचा :

  1. अचानक थिएटरमध्ये पोहोचला कार्तिक आर्यन, बच्चे कंपनीच्या डोळ्यात आनंदाश्रू - पाहा व्हिडिओ - Chandu Champion show
  2. कार्तिक आर्यन आणि करण जोहरचा 'दोस्ताना 2' का बंद झाला, आता समोर आलं खरं कारण - Dostana 2
  3. मुंबईतील होर्डिंग अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अंत्यसंस्काराला कार्तिकची हजेरी - Mumbai billboard crash

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.