ETV Bharat / entertainment

करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह पापाराझीवर संतापला, व्हिडिओ व्हायरल - kareena kapoor - KAREENA KAPOOR

Saif ali khan family : करीना कपूर आणि सैफ अली खान यांची मुले तैमूर आणि जेह सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. नुकतीच करीना आणि सैफ आपल्या मुलांबरोबर घराच्या बाहेर पडताना दिसले. यादरम्यान करीना कपूरच्या धाकट्या मुलानं पापाराझींवर आपला राग काढला.

Saif ali khan family
सैफ अली खानचं कुटुंब (करीना कपूर खान - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 1:22 PM IST

मुंबई - Saif ali khan family : अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यापैकी एक आहेत. दोघांची जोडी अनेकांना आवडते. करीना आणि सैफ दोघेही अनेकदा आपल्या कुटुंबासह एकत्र वेळ घालवताना दिसतात. हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत. करीना आणि सैफचे मुले तैमूर आणि जेह बऱ्याचदा त्याच्याबरोबर बाहेर जाताना दिसतात. हे दोघेही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहेत. दोघांच्या क्यूटनेस आणि खोडकर स्टाइलमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. अलीकडेच त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र असल्याचं दिसत आहे.

करीना कपूरच्या छोट्या मुलाला आला राग : या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधणारी व्यक्ती ही करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत करीना कपूर, सैफ अली खान आणि त्यांची दोन्ही मुले एकत्र घरातून बाहेर जाताना दिसत आहेत. सैफ पुढे जातो आणि त्याच्याशी बोलत असताना तैमूरही त्याच्या मागे येतो. यानंतर करीना कपूरबरोबर येत असताना जेहला अचानक राग येतो. रागात तो मागे वळून पाहात पापाराझींना म्हणतो, "असं करू नको ." यानंतर करीना त्याचा हात धरून त्याला पुढे घेऊन जाते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

पापाराझींवर जेहनं काढला राग : या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स देत आहेत. पापाराझींनी अशा प्रकारे मुलांचे फोटो काढणे चुकीचं असल्याचं आता यूजर्स म्हणत आहेत. याशिवाय काहीजण करीनाचा मुलगा खूपच खोडकर असल्याचं म्हणत आहे. तसेच काही लोकांना तैमूरचा एक जुना व्हिडिओ आठवला, यामध्ये देखील तैमूर हा जेहप्रमाणे रागावला होता. तैमूरचा हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे. या व्हिडिओत करीनाचे दोन्ही मुलं घराबाहेर खेळत असतात. यावेळी पापाराझी येऊन त्यांची फोटो काढतात. यानंतर तैमूरला राग येतो आणि तो पापाराझींवर राग काढतो. यात करीना तैमूरला थांबवते. तैमूर फोटो काढण्यास यावेळी नकार देत "दादा थांबवा" असं तो वारंवार म्हणतो, यानंतर तो रागानं ओरडतो. दरम्यान करीना आणि सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'सिंघम 'अगेन'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे सैफ हा 'देवरा'मध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. सैफ अली खानच्या 'फँटम' पोस्टरचा दहशतवाद्यांकडून प्रोपगंडा व्हिडिओसाठी वापर, पोलिसांचा इशारा - Phantom Poster Used by Terrorists
  2. करीना कपूर खाननं तिच्या वाढदिवशी केली पोस्ट शेअर, सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा - Kareena Kapoor
  3. करीना कपूर स्टारर 'द बकिंगहॅम मर्डर्स'चं ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - kareena kapoor detective

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.