ETV Bharat / entertainment

करीना कपूरने टांझानियातून शेअर केले पती सैफ अली बरोबरचे रोमँटिक फोटो - Kareena with Saif Ali - KAREENA WITH SAIF ALI

Kareena with Saif Ali : करीना कपूर खाननं तिच्या आफ्रिकन सफारीच्या सुट्टीतील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. टांझानियामध्ये ती तिची मुलं आणि पती सैफसह सहलीवर आहे. तिनं पती सैफ अली खान बरोबरचा एक रोमँटिक फोटोही शेअर केला आहे.

Kareena with Saif Ali :
करीना कपूर आणि सैफ अली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 10:22 AM IST

मुंबई - Kareena with Saif Ali : करीना कपर पती सैफ अली खान आणि आपल्या मुलांसह आफ्रिकन सफारीचा आनंद घेत आहे. दोन दिवसापूर्वी सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये भटकंती करत असताना आता हे जोडपं पूर्व आफ्रिकेमध्ये टांझानियातील जंगलात फिरत आहे. त्यांच्या या सुट्टीच्या काळात ती मुक्त वावरणाऱ्या जंगली प्राण्यांचं निरीक्षण करत जंगलात राहण्याचा अनुभव घेत आहे. दरम्यान, करीनानं पती सैफ अली बरोबरचे काही रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पहिल्या फोटोत करीना आणि सैफ त्यांच्या चिमुकल्यांसह विस्तीर्ण सेरेनगेटी नॅशनल पार्क पाहताना दिसत आहेत. यावेळी करीनाने चेकर्ड ब्लू शर्ट परिधान केल्याचं दिसतंय, तर सैफने हिरवा शर्ट, लाल टोपीसह नेहमी प्रमाणे रोमँटिक दिसत आहे.

तैमूर आणि जेह अली खान यांनीही यावेळी कॅज्युल कपडे परिधान केले आहेत. पुढच्या फोटोत करीना आणि सैफचे रोमँटिक क्षण कॅप्चर झाले आहेत. फोटो शेअर करताना करीनानं लिहिले की, "तुमच्या वरचे आकाश नेहमी निळे राहू दे माझ्या CREW कडून तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा..." असं म्हणत तिन सेरेनगेटीमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

करीनाने गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवर सेरेनगेटी नॅशनल पार्कमधील तिच्या कौटुंबिक सहलीची झलक शेअर केली होती. या पार्कमधील लँडस्केपचा एक सुंदर फोटो शेअर करुन चाहत्यांना आपल्या सहलीची कल्पना दिली होती. मावळतीला चाललेल्या सुर्याच्या प्रकाशानं तांबूस बनलेल्या आभाळाच्या सुंदर छटा तिनं आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला होता.

आफ्रेकेच्या विस्तीर्ण जंगलातील सेरेनगेटी नॅशनल पार्कचे आकर्षण संपूर्ण जगाच्या पर्यटकांना नेहमीत खुणावत आलंय. लाखो स्थलांतरित वाइल्डबीस्ट, हजारो प्राण्याच्या झुंडी इथं सहज पाहायला मिळतात. सुर्यस्ताच्या वेळी आकाश उधळलेले रंग आणि मैदानावरील प्राण्यांच्या झुंडी पाहण्यासाठी इथं प्रवाशी नेहमी गर्दी करत असतात. सेरेनगेटी नॅशनल पार्कला कोणत्याही ऋतूमध्ये लोक येऊन निसर्गाच्या या जादुई चमत्काराचे साक्षीदार होण्यास तयार असतात.

दरम्यान, कामाच्या आघाडीवर करीना पुढे क्रिती सेनन, तब्बू आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत 'क्रू'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

होळीच्या नावाखाली श्वानांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे भडकली श्रद्धा कपूर, केला व्हिडिओ शेअर - shraddha kapoor

'फॅमिली स्टार' रिलीजपूर्वी मृणाल ठाकूरनं यल्लम्मा पोचम्मा मंदिरात केली प्रार्थना - Mrunal thakur

तापसी पन्नू बरोबर लग्नाच्या बातम्या झळकत असताना मॅथियास बोईने दिल्या होळीच्या शुभेच्छा - Mathias Boe Extends Holi Wishes

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.