मुंबई: चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, शो होस्ट करण जोहर अनेकदा त्याच्या सिंगल स्टेटसबद्दल बोलत असतो. त्यानं आता लग्न करावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. करण 52 वर्षांचा आहे आणि त्याला सरोगसीद्वारे यश आणि रुही नावाची दोन मुले देखील आहेत. करण हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. त्याच्याकडे सर्व काही आहे पण एकच गोष्ट उणीव आहे ती, म्हणजे एका जीवनसाथीची. ही गोष्ट करणला देखील दुखावते, म्हणूनच तो अनेकदा सोशल मीडियावर आपलं दु:ख देखील व्यक्त करताना दिसतो. करण जोहरनं नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
करण जोहरनं केले शेअर फोटो : या फोटोमध्ये त्यानं सुंदर काळा कुर्ता घातला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'दिवाळीच्या रात्री, इतक्या मीटिंग, इतक्या गप्पा, अजूनही गर्दीत एकटा, सिंगल स्टेटसपासून कधी वेगळे होणार?' करणच्या या पोस्टवरून त्याला आयुष्यात जोडीदार हवा असल्याचं दिसून येत आहे. करण जोहर यावर्षी 25 मे रोजी 52 वर्षांचा झाला आहे, मात्र आतापर्यंत करण सिंगल आहे. करण जोहरच्या लिंगाबद्दल लोक अनेकदा बोलतात. एकदा करण याबद्दल म्हटलं होतं, 'मी काय आहे हे सर्वांना माहीत आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.'
करण जोहरचं वर्कफ्रंट : करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच त्यानं ' जिगरा' या चित्रपटाची निर्मित केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. 'जिगरा' चित्रपटाचं दिग्दर्शन वासन बाला यांनी केलं होतं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. बॉक्स ऑफिसचे खोटे आकडे दाखवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. या चित्रपटात वेदांग रैनानं आलियाबरोबर स्क्रिन शेअर केली. ' जिगरा'मध्ये वेदांगनं आलियाच्या भावाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. 'जिगरा'ची टक्कर राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'शी झाली. करणचे आगामी चित्रपट 'धडक 2', 'द बुल', 'तख्त' आणि 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' आहेत.
हेही वाचा :
- करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनचे 50 टक्के शेअर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांना विकले
- करण जोहर म्हणाला 'मुर्ख', दिव्या कुमारला संताप अनावर !!
- मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी करण जोहर आणि राणी मुखर्जीनं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट - Karan Johar and Rani Mukerji