ETV Bharat / entertainment

श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर हॉरर कॉमेडी 'कपकपी'साठी पुन्हा एकदा एकत्र - Shreyas Reunites with Tusshar - SHREYAS REUNITES WITH TUSSHAR

Shreyas Reunites with Tusshar : 'गोलमाल' या हिट चित्रपटानंतर श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर हॉरर कॉमेडी 'कपकपी'साठी पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन स्पेस शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे भितीदायक मोशन पोस्टर गुरुवारी लॉन्च करण्यात आलं.

Shreyas Reunites with Tusshar
श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 4:43 PM IST

मुंबई - Shreyas Reunites with Tusshar : श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर मुख्य कलाकार म्हणून 'कपकपी' या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटात काम करत असून निर्मात्यांनी गुरुवारी याची घोषणा केली. यासाठी त्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाचे मोशन पोस्टर लॉन्च करण्यात आलं.

सौरभ आनंद आणि कुमार प्रियदर्शी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. यापूर्वी 'क्या कूल हैं हम' आणि 'अपना सपना मनी मनी' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या संगीत सिवन यांनी याही चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. थ्रिलर आणि देशभक्तीपर चित्रपटांची लाट आल्यानंतर हा एक हलका फुलका चित्रपट घेऊन निर्माता जयेश पटेल मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत.

श्रेयस तळपदेनं याबाबत शेअर केलं की, "चित्रपटातील गडदपणा आणि देशभक्तीपर थीमचाचा सुरू असलेला ड्रेंड लक्षात घेऊन हा एक अस्सल हॉरर कॉमेडी प्रेक्षकांच्या विविध आवडीनिवडी पूर्ण करून हास्य आणि भिती यांचे मिश्रण असलेला हा मनोरंजक चित्रपट आहे." अलिकडेच डिसेंबर 2023 मध्ये श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर अँजिग्राफीची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यानं गोलमालचा सहकलाकार तुषार कपूर आणि दिग्दर्शक सिवन यांच्यासोबत पुन्हा एकत्र येत असल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला होता.

तुषार कपूरनं 2005 च्या काय 'कूल है हम या' चित्रपटात काम केल्यानंतर संगीत सिवन यांच्याबरोबर त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. तुषारनंही चित्रपटाची टीम आणि क्रिप्टचं कौतुक केलं आहे. 'कपकपी' चित्रपटात नवीन कलाकारांचा सहभाग आहे, याचंही त्यानं स्वागत केलं आहे. या कॉमेडी-हॉरर चित्रपटात त्याची भूमिका आजवरच्या चित्रपटाहून पूर्ण वेगळी आहे.

श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्याशिवाय 'कपकपी' या चित्रपटात सोनिया राठी, सिद्धी इदनानी, जय ठक्कर, वरुण पांडे, धीरेंद्र तिवारी, दिनकर शर्मा आणि अभिषेक कुमार यांच्याही भूमिका आहेत. ब्राव्हो एंटरटेनमेंट अंतर्गत जयेश पटेल निर्मित 'कपकपी'वेगळ्या मिश्रणाचे कॉमेडी मनोरंजन असेल.

हेही वाचा -

  1. राणी मुखर्जीनं तिच्या 46व्या वाढदिवसानिमित्त पापाराझीबरोबर कापला केक, व्हिडिओ व्हायरल - Rani Mukreji 46th birthday
  2. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' ओटीटीवर प्रदर्शित - Fighter OTT Release
  3. उर्फी जावेदची शाहरुख खानबरोबर सेल्फी व्हायरल, फोटो पाहून युजर्सना धक्का - Uorfi Javed selfie with SRK

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.