मुंबई - Kangana Ranaut : अभिनेत्री आणि वादग्रस्त भाजपा खासदार कंगना राणौत बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना राणौत भाजपची खासदार झाल्यापासून तिला तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं आहे. नुकतेच कंगना रणौतनं शेतकरी आंदोलनात बलात्कार आणि मृतदेहांचे ढिगारे असल्याचं वादग्रस्त वक्तव्य करत समुदाय विशेषाला भडकवलं आहे. कंगनाच्या अशा वक्तव्यांचा फटका तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाला बसू शकतो. तिचा हा चित्रपट 6 सप्टेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. नुकताच 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.
कंगनाला चप्पलनं मारण्याची मिळाली धमकी : या ट्रेलरमुळे शीख समुदाय दुखावला गेला असून कंगनाला आता शिरच्छेदाच्या धमक्या मिळात आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये कंगनाला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. देशाच्या करारी पंतप्रधान अशी ओळख असलेल्या दिवंगत इंदिरा गांधी यांच्या राजकीय जीवनातल्या अतिशय महत्त्वाच्या भागावर भाष्य करण्याचं काम 'इमर्जन्सी' चित्रपट करणार आहे. कंगना यात इंदिरा गांधी यांचं मध्यवर्ती पात्र साकारत आहे. मात्र आता या चित्रपटामुळे कंगनाच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान 'एक्स' प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत कंगना राणौतला चप्पलनं मारण्याची आणि शिरच्छेद करण्याची धमकी दिली जात आहे. आता हा व्हिडिओ कंगना रणौतनं पंजाब पोलिसांना टॅग केला आहे.
What is happening in our nation? People are openly threatening the life of BJP MP and Bollywood actress 𝗞𝗮𝗻𝗴𝗮𝗻𝗮 𝗥𝗮𝗻𝗮𝘂𝘁 simply for portraying India's history. Is it wrong to tell the story of the Iron Lady of India, who is celebrated as one of the country's strongest… pic.twitter.com/w1QWJhAkG3
— Rahul Chauhan (@RahulCh9290) August 26, 2024
'इमर्जन्सी' चित्रपट : व्हायरल व्हिडिओमध्ये लोक म्हणत आहेत की "जर तू 'इमर्जन्सी' चित्रपट प्रदर्शित केलास तर तुला सरदारांकडून मारहाण होईल. तुला आधीच थप्पड मारण्यात आली आहे. माझ्या देशात आणि महाराष्ट्रात तू मला कुठेपण दिसलीस तर हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधव तुझं चप्पलनं स्वागत करेल, कारण तुझी विचारसरणी खूप वाईट आहे." या व्हायरल व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांचं नाव घेत तिला खडेबोल सुनावताना दिसत आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटात कंगना राणौतनं भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे की नाही, हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच कळेल. हा चित्रपट इंदिरा गांधींनी 1975 साली देशावर लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे.
हेही वाचा :