मुंबई Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत वादग्रस्त चित्रपट 'इमर्जन्सी'मुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. 'इमर्जन्सीची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली असून कंगना यामुळे प्रचंड संतापली आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार होता. वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. दरम्यान कंगना राणौतच्या म्हणण्यानुसार, तिला आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड) यांना धमक्या येत होत्या. शिरोमणी अकाली दल आणि शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं 'इमर्जन्सी'वर आक्षेप व्यक्त केला आहे.
Law of the land is that one can show unimaginable amount of violence and nudity on OTT platforms without any consequence or censorship, one can even distort real life events to suit their politically motivated sinister motives, there is all the freedom for communists or leftists… https://t.co/BRRrG6NGXh
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 2, 2024
'इमर्जन्सी'वर बंदीची मागणी : चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्यानंतर आता कंगना राणौतनं तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणौतनं एका पॉडकास्टमध्ये म्हटलं, "माझ्या चित्रपटावरच आणीबाणी लादण्यात आली आहे, हे खूपच निराशाजनक आहे, मी माझ्या देशावर खूप नाराज आहे." कंगना राणौतनं पुढे म्हटलं, "माझ्या चित्रपटात काही नवीन नाही, याआधी 'इंदू सरकार' आणि 'सॅम बहादूर'मध्येही या गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत, मग या चित्रपटांना प्रमाणपत्र का दिलं गेलं. यानंतर कंगनानं पुढं सांगितलं की, तिच्या चित्रपटावर बंदी घालताना समितीनं चित्रपट आणि तिच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकांची दखल घेतली होती. ती निडर असल्याचं तिनं म्हटलं." कंगनानं पुढं म्हटलं, "आपण अनेक बेताल गोष्टी ऐकत असतो, आज आपण कुणाला घाबरू, उद्या कुणीतरी, लोक आपल्याला घाबरवत राहतील, कारण आपण इतक्या सहज घाबरतो, आपण किती घाबरणार?"
कंगना राणौत स्वतः या चित्रपटाचे अनकट व्हर्जन रिलीज करण्याचा प्रयत्न करत आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना तिनं म्हटलं , "मी हा चित्रपट अतिशय चांगला बनवला आहे, सेन्सॉर बोर्डालाही चित्रपटाबाबत कोणतीही अडचण नाही. त्यांनी माझ्या चित्रपटाचं प्रमाणपत्रही बनवलं होतं, मला चित्रपट फक्त अनकट व्हर्जन प्रदर्शित करायचा आहे आणि मी करणार आहे. यासाठी मी न्यायालयीन लढा देईन, इंदिरा गांधी यांचा मृत्यू त्यांच्या घरी झाला, मी ते दाखवू शकत नाही." कंगना रणौतनं तिच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स आणि झी स्टुडिओजच्या बॅनरखाली 'इमर्जन्सी' चित्रपट बनवला आहे.
हेही वाचा :
- कंगना रणौतनं पुन्हा एकदा रणबीर कपूरवर साधला निशाणा, काय म्हटलं जाणून घ्या... - Kangana Ranaut
- कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदीची मागणी, शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं पाठवली नोटीस - Emergency Trailer
- कंगना राणौतला भाजपानं दिला दम! शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यापासून घेतली फारकत - Kangana Ranaut