ETV Bharat / entertainment

कमल हासन स्टारर 'इंडियन 2' 'या' दिवशी होईल जगभरात प्रदर्शित, पाहा तारीख - kamal haasan starrer indian 2 - KAMAL HAASAN STARRER INDIAN 2

INDIAN 2 : साऊथ अभिनेता कमल हासन अभिनीत 'इंडियन 2' हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेटबद्दल निर्मात्यांनी एक अपडेट शेअर केली आहे.

INDIAN 2
इंडियन 2 ((फाईल फोटो) (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 4:36 PM IST

मुंबई - INDIAN 2 : साऊथचा मेगास्टार कमल हासन त्याचा आगामी चित्रपट 'इंडियन 2'च्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. अलीकडे, सोशल मीडियावर अशी चर्चा होती की 'इंडियन 2'ची रिलीज डेट ऑगस्टपर्यंत पुढं ढकलला जाऊ शकते. 'इंडियन 2'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट्सद्वारे त्यांनी सांगितलं की, हा चित्रपट यावर्षी 12 जुलै रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. 'इंडियन 2' तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल अपडेट्स शेअर करून चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. सध्या या चित्रपटाचे निर्माते 'इंडियन 2'चं प्रमोशन जोरदार करत आहे.

'इंडियन 2' चित्रपटबद्दल : निर्मात्यांनी 'इंडियन 2' चे नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. 'इंडियन 2' मलेशिया आणि यूएसए सह जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कमल हासन व्यतिरिक्त 'इंडियन 2' चित्रपटामध्ये काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह, सिद्धार्थ, प्रिया भवानी शंकर, एसजे सूर्या, विवेक, नेदुमुदी वेणू यांसारखे अनेक प्रसिद्ध स्टार्स आहेत. अनिरुद्ध रविचंदरनं या चित्रपटाला संगीत दिलं आहे. दरम्यान कमल हासनचा 'इंडियन' चित्रपट 1996मध्ये आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. शंकर यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा एस. शंकर 'इंडियन 2' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करण्यासाठी येत आहे.

कमल हासनचे आगामी चित्रपट : 'इंडियन 2' व्यतिरिक्त, कमल हासन 27 जून 2024 रोजी रिलीज होणाऱ्या 'कल्की 2898 एडी'मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांसारख्या बड्या स्टार्सचा समावेश आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विननं केलं आहे. याशिवाय पुढं तो 'विक्रम 2', 'इंडियन 3', 'ठग लाइफ', 'आमरण', 'थलायवन इरुक्किंद्रन' आणि 'पापनासम 2' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं फ्रेंड्सबरोबर साजरी केली बॅचलर पार्टी - SONAKSHI SINHA AND ZAHEER IQBAL
  2. फोर्ब्स 2024 च्या यादीनुसार सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय स्टार्स - shah rukh khan and deepika padukone
  3. 'मिर्झापूर सीझन 3'चा ट्रेलर होईल 'या' दिवशी रिलीज, पाहा तारीख - Mirzapur Season 3 Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.