ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी' बाबत मोठं अपडेट! प्रभास स्टारर चित्रपटाला मिळाली नवी रिलीजची तारीख - Kalki 2898 Ad Update - KALKI 2898 AD UPDATE

'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या बाबतीत एक मोठे अपडेट समोर आलं आहे. अपेक्षेप्रमाणे, निर्मात्यांनी प्रभास स्टाररच्या नवीन रिलीजची तारीख जाहीर केली. नाग अश्विन दिग्दर्शित साय-फाय ड्रामा 27 जूनला रिलीजसाठी पुढे ढकलला आहे.

Kalki 2898 Ad BIG Update
'कल्की 2898 एडी'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 7:33 PM IST

मुंबई - प्रभास स्टारर कल्की '2898 AD' च्या निर्मात्यांनी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणवली आहे. या बहुप्रतीक्षित साय-फाय ड्रामा चित्रपटाबाबतचे नवे अपडेट शेअर केले आहे. अपेक्षेनुसार टीम 'कल्की 2898 एडी'ने सोशल मीडियावर चित्रपटाचे अपडेट शेअर केले. निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट आधी 9 मे रोजी मोठ्या पडद्यावर येणार होता, परंतु आता 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेला हा आगामी चित्रपट भविष्यात एक पौराणिक कथा-प्रेरित साय-फाय एक्स्ट्राव्हॅगान्झा असेल, असे मानलं जातं.

'कल्की एडी 2898' या चित्रपटाचे भारतात आणि जगभरातील महत्त्वाच्या शहरात शूटिंग पार पडले. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच मोठी उत्कंठा तयार झाली होती. या चित्रपटात 'बाहुबली' स्टार प्रभास याच्याबरोबरच अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी सारखे मोठे स्टार्स असल्यामुळे चित्रपटाची प्रतीक्षा वाढीस लागली होती . चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं असून त्याचं पोस्ट प्रॉडक्शन जोरात सुरू असल्याच्या बातम्या यापूर्वी झळकल्या होत्या. यामध्ये ग्राफिक्स तंत्रज्ञनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. मात्र सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याच्या बातम्या समोर आल्यानं काही प्रमाणात चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. याआधी 'कल्की एडी 2898' मकर संक्रांतीच्या काही दिवस आधी म्हणजे 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार होता. याच तारखेला 6 साऊथ चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे या चित्रपटाची रिलीज डेट बदलून 9 मे करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चित्रपटाला जून महिन्यातील नवीन रिलीज तारीख मिळाली आहे. या तारखेला तरी हा चित्रपट प्रदर्शित होणार का याबाबतही चाहत्यांच्या मनात थोडी शंका निर्माण झाल्यास फार वेगळं ठरवता येणार नाही.

हेही वाचा -

  1. 'तारक मेहता...' फेम अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता, महत्त्वपूर्ण फुटेज पोलिसांच्या हाती - Gurucharan Singh Missing
  2. 'खेल खेल में'पासून ते 'वेलकम 3'पर्यत यंदा अक्षय कुमारचे रिलीज होणार सलग 5 चित्रपट - akshay kumar Movies
  3. आयुष शर्मा अभिनीत 'रुसलान'नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली लाखात कमाई - ruslaan box office day 1

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.