ETV Bharat / entertainment

ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्टी 1'मधील 'फिअर' गाणं आज संध्याकाळी होणार रिलीज, पाहा पोस्ट - DEVARA PART 1 - DEVARA PART 1

Devara Part 1: ज्युनियर एनटीआरच्या आगामी 'देवरा: पार्ट 1' या चित्रपटातील 'फिअर' गाणं आज, 19 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी रविवारी चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करुन याबद्दल अपडेट दिली आहे.

Devara Part 1
देवरा: पार्ट 1 ('देवरा: पार्ट 1' का नया पोस्टर (@devaramovie instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 4:06 PM IST

मुंबई Devara Part 1 : ज्युनियर एनटीआर स्टारर आगामी चित्रपट 'देवरा पार्ट 1' हा खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोरतला सिवा यांनी केलंय. हा वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला या चित्रपटामध्ये एनटीआर अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. आता या चित्रपटामधील पहिला ट्रॅक 'फिअर' रिलीज होणार असल्याच्या चर्चा आहे. आज 19 मे रोजी या चित्रपटामधील गाणं रिलीज होणार आहे. दरम्यान निर्मात्यांनी रविवारी 'देवरा पार्टी 1'चं नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. आज संध्याकाळी 7.02 वाजता 'फेयर' गाणं प्रदर्शित होणार असून अनेकजण हे गाणं पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

'देवरा पार्ट 1' होईल 'या' दिवशी रिलीज : जान्हवी आणि सैफ अली खाननं 'देवरा पार्ट 1' या चित्रपटाद्वारे टॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. निर्मात्यांनी 'देवरा पार्ट 1' ची रिलीज तारीख 10 ऑक्टोबर 2024 निश्चित केली आहे. सध्या चित्रपटाची वाट अनेकजण आतुरतेनं पाहात आहेत. 'आरआरआर'च्या प्रचंड यशानंतर, ज्युनियर एनटीआर 'देवरा पार्ट 1' या चित्रपटामध्ये दिसला. सध्या या चित्रपटाची स्टार कास्ट या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. गेल्या शुक्रवारी निर्मात्यांनी या गाण्याचा प्रोमो रिलीज केला होता. 'फिअर' गाण्याचा प्रोमो अनेकांना आवडला होता. हे गाणं प्रसिद्ध गीतकार रामजोगय्या शास्त्री यांनी लिहिलं असून अनिरुद्ध यांनी संगीतबद्ध केलं आहे.

वर्कफ्रंट : 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट 300 कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटाचे दोन भाग असणार आहे. चित्रपटाची अधिकृतपणे घोषणा एप्रिल 2021 मध्ये करण्यात आली होती. दरम्यान 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट खूप मनोरंजक असणार आहे. तसेच ज्युनियर एनटीआरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'वॉर 2' या चित्रपटामध्ये हृतिक रोशनबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. 'वॉर 2' चित्रपटामध्ये एनटीआर आणि हृतिकची प्रेक्षकांना भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. 'वॉर 2' चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. हा चित्रपट यशराज बॅनर बनवत आहे.

हेही वाचा :

  1. आरसीबी आयपीएल प्लेऑफमध्ये सामील झाल्याचा आनंद मावेना! अनुष्का शर्मासह विराट कोहली झाले भावूक - anushka sharma and virat kohli
  2. राज्यातील मतदानाचा टक्का घसरला, जॅकी भगनानीनं जनतेला 'हे' केलं आवाहन - Lok Sabha Elections 2024
  3. 'जॉली एलएलबी 3'चं राजस्थानमधील शूटिंग पूर्ण होताच अक्षयचा दिलदारपणा, ५०० मुलींकरिता जाहीर केली मदत - jolly llb 3 Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.