ETV Bharat / entertainment

जॉन अब्राहम स्टारर 'वेदा' चित्रपटाचं पोस्टर रिलीज - जॉन अब्राहम

John Abraham Vedda Movie :अभिनेता जॉन अब्राहम 'वेदा' चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. जॉननं त्याच्या आगामी चित्रपटाची पोस्टर्स आज त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहेत.

John Abraham Vedda Movie
जॉन अब्राहम वेदा चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 1:13 PM IST

मुंबई - John Abraham Vedda : बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहम पुन्हा एकदा ॲक्शन अवतारात दिसणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये जॉन शाहरुख खान स्टारर ॲक्शन चित्रपट 'पठाण'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. आता जॉन अभिनीत 'वेदा' नावाच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आज, 7 फेब्रुवारी रोजी जॉननं त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यानंतर काही वेळानं त्याने या चित्रपटामधील दुसरे पोस्टर रिलीज केले. या चित्रपटामधील जॉन आणि शर्वरी वाघचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'वेदा' चित्रपटामधील फर्स्ट लूकमध्ये जॉनच्या पाठीवर आणि हातात बंदूक आहेत. उजव्या हाताच्या मनगटावर त्यानं पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या बांधल्या आहेत.

'वेदा' चित्रपटाचं पोस्टर : ऑलिव्ह कलरचे जॅकेट आणि ग्रे कार्गो पँटमध्ये दिसणारा जॉनचा हा लूक अनेकांना आवडला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करून त्याला आगामी चित्रपटाबद्दल शुभेच्छा देत आहेत. याशिवाय दुसऱ्या पोस्टरमध्ये जॉनसह शर्वरी पोस्टरमध्ये दिसत आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित आणि असिन अरोरा लिखित 'वेदा' ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि जॉन अब्राहमनं केली आहे. 'वेदा' चित्रपटाच्या सहनिर्मात्या मीनाक्षी दास आहे. जॉन स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 12 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तमन्ना भाटियानं दिली प्रतिक्रिया : तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ हे 'वेदा' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं हाय-ऑक्टेन ॲक्शन-ड्रामा 'वेद'चे शूटिंग नुकतेच राजस्थानमध्ये सुरू झाले आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना तमन्नाने म्हटलं, "निखिल ज्या प्रकारे त्याच्या चित्रपटाची कहाणी सांगतो, याबद्दल मी नेहमीच त्याची फॅन आहे. या चित्रपटातून जॉन आणि मला पहिल्यांदाच एकत्र काम करण्याची संधी मिळाली.'' निखिलनं तमन्नाबद्दल बोलताना म्हटलं, "तमन्नानं नेहमीच उत्कृष्ट अभिनय केला आहे. जेव्हा मी तिच्याकडे एक विशेष भूमिका साकारण्यासाठी संपर्क साधला, तेव्हा तिनं लगेच या चित्रपटासाठी होकार दिला. मी आणि माझी टीम या चित्रपटाबद्दल खूप उत्साहित आहोत.''

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रानं दाखवली कुशीतील मालतीबरोबरची सुंदर झलक
  2. व्हॅलेंटाईन वीक आणखी रोमँटिक बनवा, ओटीटीवर पाहा हे चित्रपट
  3. ईशा देओल आणि भरत तख्तानी लग्नाच्या १२ वर्षांनंतर झाले वेगळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.