ETV Bharat / entertainment

'कोटा फॅक्टरी' सीझन 3 च्या रिलीजची तारीख क्रॅक करण्यासाठी जितेंद्र कुमारनं घातलं चाहत्यांना कोडं - Kota Factory - KOTA FACTORY

'कोटा फॅक्टरी'च्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या जून महिन्यात ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. याची तारीख सांगण्यासाठी जितेंद्र कुमारनं प्रेक्षकांना एक गणित सोडवण्यास भाग पाडलं आहे.

'Kota Factory' Season 3
'कोटा फॅक्टरी' सीझन 3 (Netflix instagram image)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 2:25 PM IST

मुंबई - 'कोटा फॅक्टरी' या वेब मालिकेचा बहुप्रतिक्षित तिसरा सीझन येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याची रिलीजची तारीख जाहीर करण्यासाठी इंस्टाग्रामवर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने जीतू भैय्या उर्फ ​​जितेंद्र कुमार याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये प्रेक्षकांचा लाडका जीतू भैय्या स्क्रिनवर येतो आणि 'कोटा फॅक्टरी' जूनमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर करतो. तारीख ओळखण्यासाठी तो ब्लॅक बोर्डवर एक गणिताचं समीकरण देतो. हे समीकरण सोडवल्यास तुम्हाला 'कोटा फॅक्टरी'च्या प्रदर्शनाची तारीख कळणार आहे.

व्हिडिओमध्ये, जितेंद्रनं चाहत्यांना 'कोटा फॅक्टरी' सीझन 3 च्या रिलीजच्या तारखेबद्दल डिवचलं आहे. त्यांना गणिताचं समीकरण डिकोड करण्यास सांगितलंय. "मी लवकरच कोटा फॅक्टरी सीझन 3 सह येत आहे. तारीख लक्षात ठेवा. कोटा फॅक्टरी सीझन 3 चा नवा सीझन जूनमध्ये रिलीज होत आहे... याची तारीख मी सहज सांगणार नाही," असं तो पुढे व्हिडिओत म्हणाला. त्यानं प्रेक्षकांना गणिताचं समीकरण सोडवण्यास सांगितले आणि रिलीजच्या तारखेचं उत्तर शोधण्यास भाग पाडलं आहे.

हा व्हिडिओ प्रदर्शित होताच त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये भरभरुन कमेंट्स येत आहेत. अनेक जण जितेंद्रनं पडद्यावर सांगितलेलं गणिताचं समिकरण सोडवत असून प्रत्येकाच्या गणिताचं उत्तर वेगवेगळं येत आहे. अनेकांनी 16 आणि 20 जून ही उत्तरं दिली आहेत. काहींनी 15 जून आणि 28 जून सारख्या तारखाही आणल्या आहेत. मात्र याचं खरं उत्तर 20 असून या तारखेलाच 'कोटा फॅक्टरी'चा नवा सीझन प्रसारित होणार आहे.

आगामी सिझनमध्ये अभिनेता जितेंद्र कुमार, मयूर मोरे, अहसास चन्ना, आलम खान आणि रंजन राज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'कोटा फॅक्टीरी'च्या या नव्या सीझनमध्ये कठीण प्रारंभिक तयारी आणि शैक्षणिकांच्या अथक दबावाला तोंड देऊन, विद्यार्थी सर्व-महत्त्वाच्या IIT JEE परीक्षेसाठी स्वतःला तयार करतात. यामध्ये जीतू भैय्या त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी गुरू म्हणून ठाम उभा असलेला दिसेल. या शोच्या मागील दोन सीझनला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा -

सनी देओलवर फसवणूकीसह खंडणीचा आरोप, चित्रपट निर्मात्याचा धक्कादायक खुलासा - Sunny Deol

लवकरच प्रदर्शित होणारे 10 कॉमेडी चित्रपट तुम्हाला करतील टेन्शन फ्री, पाहा रिलीज तारखा - Top ten Coming Soon Comedy Movie

विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा नाद सोडा अन् संगीतात रममाण व्हा; 'लिटिल चॅम्पचा' बालमित्रांना सल्ला - Geet Bagde Advice To Child

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.