ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूर स्टारर 'उलझ'चा पहिला आकर्षक ट्रॅक 'शौकन'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ - JANHVI KAPOOR - JANHVI KAPOOR

Ulajh First Track: जान्हवी कपूरचा 'उलझ' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून आता पहिल्या ट्रॅकचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

Ulajh First Track
उलझ पहिला ट्रॅक (जाह्नवी कपूर (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 5:28 PM IST

मुंबई - Ulajh First Track: जान्हवी कपूरचा 'उलझ' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता जान्हवी स्टारर 'उलझ' या चित्रपटामधील पहिला ट्रॅक 'शौकन' कधी रिलीज होईल याबद्दल सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर जान्हवीनं 'शौकन' गाण्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "शौकन' उद्या रिलीज होईल." 'उलझ' 2 ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. "शौकन'च्या टीझरमध्ये एका नाईट कल्बमध्ये जान्हवी डान्स करताना दिसत आहे. 'उलझ'चा पहिला ट्रॅक 22 जुलैला प्रदर्शित होईल.

'शौकन' गाण्याचं टीझर : जान्हवीनं अलीकडेच, गायिका नेहा कक्करबरोबरचा सोशल मीडियावर फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होतं, "माझ्या पुढच्या गाण्याचा आवाज." यानंतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये नेहानं लिहिलं होतं, "माझ्या आगामी गाण्याचा चेहरा." 'शौकन' या गाण्याला नेहानं आवाज दिल्याचं दिसून येत आहे. आता या गाण्याच्या रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत. 'शौकन' गाण्याच्या टीझर पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "जान्हवी खूप सुंदर दिसत आहे." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "आता या गाण्याच्या रिलीजची वाट पाहू शकत नाही." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "बॉलिवूडमधून सर्वात सुंदर अभिनेत्री" याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

'उलझ'चा ट्रेलर : 'उलझ'च्या ट्रेलरमध्ये जान्हवी कपूर सुहानाच्या भूमिकेत दिसत आहे, जी लंडन दूतावासात कडक देखरेखीखाली कठीण मिशन पार पाडणारी सर्वात तरुण उप उच्चायुक्त आहे. गुलशन देवैयाही या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. त्याबद्दल जान्हवीनं चाहत्यांचे आभारही व्यक्त केले आहे. तिनं एका निवेदनात म्हटलं होत की, "ट्रेलरला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे मी आनंदी आहे. मला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहते आणि प्रेक्षकांची खरोखर आभारी आहे. मी पहिल्यांदाच आयएफएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे." सुधांशू सारिया आणि परवेझ शेख लिखित आणि अतिका चौहान यांच्या संवादांनी सजलेला 'उलझ' हा चित्रपट मनोरंजक असेल असं ट्रेलरवरून दिसत आहे.

हेही वाचा :

  1. जान्हवी कपूरला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, प्रकृतीबाबत पिता बोनी यांनी दिलं महत्त्वाचं अपडेट - JANHVI KAPOOR HEALTH
  2. 'अन्नातून विषबाधा' झाल्यामुळे जान्हवी कपूरवर उपचार सुरू, उद्यापर्यंत मिळू शकतो डिस्चार्ज - JANHVI KAPOOR FOOD POISONING

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.