ETV Bharat / entertainment

शिखर पहारियाबरोबरच्या तिरुपतीमधील लग्नाच्या अफवांवर जान्हवी कपूरनं दिली प्रतिक्रिया - janhvi kapoor - JANHVI KAPOOR

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरनं शिखर पहाडियाबरोबरच्या लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. आता तिनं केलेली कमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 4:06 PM IST

मुंबई- Janhvi Kapoor : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर आता शिखर पहाडियाबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघेही अनेकदा एकत्र पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये दिसतात. अलीकडेच जान्हवी कपूरबद्दलची एक अफवा सोशल मीडियावर पसरली होती. रिपोर्ट्सनुसार जान्हवी कपूरला शिखरबरोबर तिरुपती मंदिरात लग्न करायचं होतं. आता या बातम्या निराधार असल्याचं तिनं म्हटलं आहे. एका इंस्टाग्राम पेजवर जान्हवी आणि शिखरचे काही फोटो शेअर करण्यात आले होते. या पोस्टमध्ये असं लिहण्यात आलं होत की,आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात जान्हवी कपूरला शिखरबरोबर लग्न करायचं होतं.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर (Instagram)

जान्हवी कपूरनं लग्नाच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया : आता जान्हवीनं याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तिनं कमेंट विभागात असं लिहिलं, "काहीही." सध्या ही कमेंट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान 'कॉफी विथ करण'मध्ये तिचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरबरोबर डेब्यू करताना जान्हवी कपूरनं तिच्या लग्नावर वक्तव्य केलं होतं. यानंतर तिचं नाव शिखर पहाडियाशी जोडलं गेलं होतं. करणच्या शोमध्ये जान्हवी म्हणाली होती, "माझ्या मनात सुरुवातीपासूनच स्पष्ट चित्र आहे. मी तिरुपतीमध्ये लग्न करणार असून या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. मला माहीत आहे की मी सोनेरी कांजीवराम साडी नेसेन आणि माझ्या केसात भरपूर मोगरा माळेन. माझा नवरा लुंगीत असेल आणि आम्ही केळीच्या पानांवर जेवण करू."

जान्हवी कपूर करणार 'या' ठिकाणी विवाह : मीडिया संवादात जान्हवीनं सांगितलं होतं की, ती अनेक वेळा तिरुपतीला गेली आहे आणि तिला तिकडे लग्न करायचं आहे. तिनं पुढं म्हटलं होत, "मला भव्य विवाह आवडत नाहीत. ग्रॅण्ड वेडिंगमध्ये म्हणजे मजा असते, पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात जेव्हा सगळ्यांचे लक्ष तुमच्याकडे असते तेव्हा, तुम्ही घाबरून जाता. आता यावरून स्पष्ट झालं की, जान्हवी ही तिरुपतीला लग्न करेल. दरम्यान जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी वरुण धवन स्टारर 'बवाल'मध्ये दिसली होती. आता पुढं ती राजकुमार रावबरोबर 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'सनी संस्कारी तुलसी कुमारी' आणि 'देवरा' चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाचं पुन्हा राजस्थान कनेक्शन, आरोपींना पैसे पुरविणाऱ्या आरोपीला अटक - salman khan house firing case
  2. आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी केली नाराजी व्यक्त - Alia Bhatt Deepfake Video
  3. रितेश-जेनेलियानं लातूरमध्ये केलं मतदान, प्रत्येकानं मत देण्याचं केलं आवाहन - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.