मुंबई - Janhvi kapoor: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा राजकुमार रावबरोबरचा चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही' हा अनेकांना आवडला होता. या चित्रपटाचं तिनं खूप प्रमोशन देखील केलं होतं. 'धडक' चित्रपटातून डेब्यू केल्यानंतर जान्हवी 'गुंजन सक्सेना', 'मिली' आणि 'गुड लक जेरी' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिच्या या चित्रपटांनाही प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. एका मुलाखतीत, जान्हवीला जेव्हा विचारण्यात आलं की, एक अभिनेत्री म्हणून ती स्वत:ला कुठे पाहते, यावर तिनं उत्तर दिलं, "मी स्वतःबद्दल कसे बोलू शकते. मी खूप आत्मविश्वासू आहे, मी खूप चांगला परफॉर्मन्स देत आहे!' मी स्वतः सांगू शकत नाही."
'माझ्याकडे इतके बजेट नाही' - जान्हवी कपूर : यानंतर तिला सांगण्यात आलं की, लोक तिच्याबद्दल खूप चांगले बोलतात, यावर तिनं खिल्ली उडवत म्हटलं, "मी लोकांना चांगले बोलण्यासाठी पैसे देते." तिचा मुद्दा स्पष्ट करताना जान्हवीनं पुढं सांगितलं, "मी सोशल मीडियावर पाहते की, "जर कोणी चुकून माझी स्तुती केली तर लोक म्हणतात की हा माझा पीआर आहे." लोकांकडून प्रशंसा मिळवण्याइतके बजेट माझ्याकडे नाही." दरम्यान जान्हवी यावर्षी दोन चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनबरोबर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिनं कॅमियो केला होता. यानंतर ती 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसली. या चित्रपटामधील तिचा अभिनय अनेकांना आवडला होता. जान्हवीनं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे.
जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट : तिचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हिट ठरला होता. आता पुढं जान्हवी 'उलझ' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवीबरोबर गुलशन देवय्या, राजेश तैलंग, रोशन मॅथ्यू, आणि आदिल हुसैन हे कलाकर असणार आहेत. चित्रपटात जान्हवी एका भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे, जी परदेशात तिच्या देशाविरुद्ध रचल्या जात असलेल्या कटाचा एक भाग बनते. 'उलझ' 2 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर जान्हवी ज्युनियर एनटीआरबरोबर 'देवरा'मध्ये दिसणार आहे. जान्हवीचा हा दुसरा साऊथ चित्रपट आहे.
हेही वाचा :