मुंबई - जान्हवी कपूर आणि राजकुमार राव आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहेत. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. हा चित्रपट या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच जान्हवीने चेन्नई येथे पार पडलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील आयपीएल अंतिम सामन्याला हजेरी लावली. यावेळी जान्हवीसह तिचा चित्रपटातील सहकलाकार राजकुमार रावही तिच्याबरोबर होता. केकेआरच्या विजयानंतर दोघांनी आनंद व्यक्त केला आहे.
जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांनी रविवारी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी फोटोंची मालिका शेअर केली आहे. यामध्ये दोघेही केकेआरच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना जान्हवीनं 'मिस्टर अँड मिसेस माही डे आऊट' असं कॅप्शन दिलं आहे.
पहिल्या काही फोटोंमध्ये जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टँडमध्ये दिसत आहेत. दोघेही मॅच एन्जॉय करताना दिसतात. जान्हवी कपूरने हिरवा आणि पांढरा चमकदार टॉप घातला होता. मोकळे केस आणि कमीत कमी मेकअप करून ती खूप सुंदर दिसत होती.
राजकुमार रावच्या गेटअपबद्दल सांगायचे तर, त्यानं चमकदार पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता. फोटोत दोघेही एकमेकांना मिठी मारताना आणि हसताना दिसत आहेत. शेवटच्या फोटोत ते चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर केकेआरचा विजय साजरा करताना दिसत आहेत. जान्हवी आणि राजकुमार व्यतिरिक्त 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये अभिषेक बॅनर्जी, कुमुद मिश्रा, राजेश शर्मा असे अनेक सहकलाकार आहेत. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
- 'केकेआर'च्या विजयानंतर शाहरुख खानचं कुटुंब झालं भावूक, बाप लेकीच्या डोळ्यात आनंदाश्रू - IPL 2024 Final
- अनंत-राधिका प्री-वेडिंग फंक्शनसाठी सलमान खान रणबीर, आलिया आणि धोनीसह इटलीला रवाना - Anant Radhika Pre Wedding
- आमिरचा मुलगा ओटीटी पदार्पणासाठी सज्ज, जाणून घ्या जुनेद खानचा 'महाराजा' कधी आणि कुठे होणार रिलीज - Junaid Khan OTT debut