ETV Bharat / entertainment

जम्मू काश्मीरमधील रियासी बस हल्ल्यात नऊ जणांच्या मृत्यूबद्दल बॉलिवूड सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त - REASI BUS ATTACK - REASI BUS ATTACK

Jammu Kashmir Reasi Bus Attack : जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यात 9 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 32 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेवर बॉलिवूड स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे.

Jammu Kashmir Reasi Bus Attack
जम्मू काश्मीर बस हल्ला (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 2:07 PM IST

मुंबई - Jammu Kashmir Reasi Bus Attack : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात शिव खोरी मंदिरात जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर बस खोल खड्ड्यात पडली. या दुःखद घटनेनंतर हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त करत पीडितांसाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान मंडी खासदार कंगना राणौतनेही संशयित दहशतवादी हल्ल्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं इंस्टाग्राम स्टोरीजवर अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत लिहिलं, "जम्मू आणि काश्मीरमधील रियासी येथील यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. ते वैष्णोदेवी दर्शनासाठी जात होते आणि फक्त हिंदू असल्यानं दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मी मृतांसाठी प्रार्थना करते आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी इच्छा व्यक्त करते. ओम शांती." याशिवाय रितेश देशमुखनं देखील याप्रकरणी पोस्ट शेअर केली आहे.

Jammu Kashmir Reasi Bus Attack
जम्मू काश्मीर बस हल्ला (instagram)
Jammu Kashmir Reasi Bus Attack
जम्मू काश्मीर बस हल्ला (instagram)
Jammu Kashmir Reasi Bus Attack
जम्मू काश्मीर बस हल्ला (instagram)

यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला : रितेश देशमुखनं शोक व्यक्त लिहिलं, "रियासी दहशतवादी हल्ल्याचे दृश्य पाहून मला धक्का बसला आहे. पीडित आणि कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो." तसेच अनुपम खेर यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवर या घटनेचा निषेध करत लिहिलं, "जम्मूच्या रियासीमध्ये यात्रेकरूंवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी खूप संतापलो आणि दुःखी झालो. देव पीडितांच्या प्रियजनांना हे दुःख आणि नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो."

Jammu Kashmir Reasi Bus Attack
जम्मू काश्मीर बस हल्ला (instagram)

बॉलिवूड कलाकारांनी केला शोक व्यक्त : वरुण धवननं या हल्ल्याबाबत पोस्ट शेअर करत लिहिलं, "रियासीमध्ये निष्पाप यात्रेकरूंवर झालेल्या भीषण हल्ल्यानं धक्का बसला आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मी मृतकांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. ओम शांती." तसेच आयुष्मान खुलाना या हल्ल्याबाबत निषेध करत लिहिलं, "क्रेपी निरपराध यात्रेकरूंवर झालेल्या या भ्याड हल्ल्यानं अतिशय दु:ख झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबियांच्या संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. याशिवाय साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानं इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिलं, "रियासी हल्ल्यात बळी पडलेल्या सर्वांप्रती मी शोक व्यक्त करते, भितीदायक. या घटनेत निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते."

जम्मू-काश्मीरमध्ये बसवर हल्ला : गेल्या रविवारी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील तेरायथ गावाजवळ दहशतवाद्यांनी यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर हल्ला केला. हल्ल्यानंतर त्यांची बस रस्त्यावरून जाऊन खड्ड्यात पडली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 33 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा :

  1. नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या कोण काय म्हणाले... - Narendra Modi PM Oath
  2. ओठांवर हसू, चेहऱ्यावर अभिमान, अनुष्का आणि रितिकानं साजरा केला भारताचा विजय - IND VS PAK T20 WORLD CUP 2024
  3. सोनाक्षी सिन्हाचं झहीर इक्बालबरोबर लग्न होईल?, सोशल मीडियावर चर्चेला उधाण - SONAKSHI SINHA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.