ETV Bharat / entertainment

जॅकलीन फर्नांडिसनं बकरीला पाजलं दुध, व्हिडिओ व्हायरल - jacqueline fernandez - JACQUELINE FERNANDEZ

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिस तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आली आहे. ती सध्या परदेशात सुट्टीचा आनंद घेत आहे.

Jacqueline Fernandez
जॅकलीन फर्नांडिस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 4:15 PM IST

मुंबई - Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिस बी-टाऊनच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि प्रत्येकदा तिचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना धक्क करून सोडत असते. जॅकलिन सध्या परदेशात सुट्टी एन्जॉय करत आहे. तिनं 24 एप्रिल रोजी सोशल मीडियावर काही सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "लव्ह लाईट हॅप्पीनेस अँन्ड बेबी गोट्स." याशिवाय तिनं पोस्टवर फुले आणि पांढरे हार्ट देखील जोडले आहे. शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती बोटमध्ये बसून फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोत ती आश्चर्यचकित होऊन कुठल्या तरी दृश्याकडे पाहात आहे.

जॅकलिन फर्नांडिसनं शेअर केले फोटो आणि व्हिडिओ : याशिवाय तिनं एक व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काही बकऱ्यांना प्लास्टिकच्या बाटलीनं दुध पाजताना दिसत आहे. ती व्हिडिओमध्ये खूप आनंदी दिसत आहे. दरम्यान जॅकलिनच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं तपकिरी रंगाचा स्लीव्हलेस बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिनं एक सुंदर अशी हॅट घातली आहे. तिनं कमीत कमी मेकअप, सोनेरी कानातले आणि पिच रंगीत फुटवेअरनं तिचा लूक पूर्ण केला आहे. याशिवाय तिनं तिचे केस हे पूर्णपणे बांधले आहेत. यावर ती खूप देखणी दिसत आहे.आता तिचे चाहते फोटो आणि व्हिडिओ पाहून तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

जॅकलिन फर्नांडिस वर्कफ्रंट : जॅकलिनचा लेटेस्ट अल्बम 'यम्मी यम्मी' सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. हे गाणे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावरही अनेकजण या गाण्यावर रील्स तयार करत आहेत. या गाण्यात जॅकलिननं शानदार डान्स परफॉर्मन्स दिला होता. जॅकलीन बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर असली तरी ती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'फतेह' चित्रपटामध्ये सोनू सूदबरोबर दिसणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमार , सुनील शेट्टी आणि रवीना टंडनबरोबर 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. वरुण धवननं कुटुंबाबरोबर शेअर केला 37वा वाढदिवस, फोटो व्हायरल... - varun dhawan
  2. शाहरुख खानसाठी मोहनलालच्या घरी होणार डिनर पार्टी, 'जिंदा बंदा'वर थिरकणार दोन सुपरस्टार्स? - Shah Rukh Khan
  3. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कपिल शर्मानं आमिर खानला केला तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न - The Great Indian Kapil Show

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.