मुंबई - screening of TBMUJ : शाहिद कपूरचा चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' आज ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ८ फेब्रुवारीच्या रात्री मुंबईत पार पडले. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी यासाठी हजेरी लावली आणि चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीही इथे एकत्र आले होते. येत्या काही दिवसांत हे दोघे लग्न करणार आहेत. त्याच वेळी, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचे संपूर्ण कुटुंब 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या स्क्रीनिंगला पोहोचले होते.
येथे शाहिद कपूरचा धाकटा भाऊ ईशान खट्टर त्याची आई निलिमा अजीम आणि गर्लफ्रेंड चांदनीसोबत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या स्क्रीनिंगला पोहोचला होता. त्याचवेळी ईशानची एक्स गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही या स्क्रिनिंगला पोहोचली होती.
'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या स्क्रीनिंगमधून बाहेर आलेल्या व्हिडिओमध्ये इशान खट्टर त्याची आई आणि मैत्रिणीसोबत रेड कार्पेटवर येताना दिसत आहे. ईशान आणि चांदनी एकमेकांचे हात धरताना दिसत आहेत. इशान ब्लॅक लूकमध्ये धडाकेबाज दिसत आहे. तर, चांदनीने बॉडी हगिंग ग्रीन कलरचा ड्रेस परिधान केला आहे, यामध्ये ती खूप बोल्ड आणि बिनधास्त दिसत आहे.
या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये जान्हवी कपूरनेही तिच्या हॉटनेसने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. जान्हवी आणि ईशानने 2018 मध्ये धडक या चित्रपटातून पदार्पण केले होते, त्यानंतर त्यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती, परंतु दोघांनी कधीही त्यांचे नाते सार्वजनिकपणे मान्य केले नव्हते. आता ईशान मलेशियन मॉडेल चांदनी बंजला डेट करत आहे. ईशान आणि चांदनी जेव्हा दोघे बाईकवर एकत्र दिसले तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात आले. सप्टेंबर 2023 मध्ये, इशान आणि चांदनीने एकत्र एका कार्यक्रमात त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. ईशान आणि चांदनी जून 2023 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
हेही वाचा -