ETV Bharat / entertainment

गाण्याच्या अनधिकृत वापराबद्दल इलैयाराजांनी 'मंजुम्मल बॉईज'च्या निर्मात्यांना दिली कॉपीराइट नोटीस - Manjummel Boys - MANJUMMEL BOYS

Manjummel Boys : सौबिन शाहीर आणि श्रीनाथ भासी यांच्या भूमिका असलेल्या 'मंजुम्मल बॉईज' चित्रपट कायदेशीर अडचणीत सापडला आहे. प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी तमिळ चित्रपट गुना मधील 'कन्मणी अनबोडू कादलन' या गाण्याच्या अनधिकृत वापराबद्दल निर्मात्यांना कॉपीराइट नोटीस जारी केली आहे.

Ilaiyaraaja Issues Copyright Notice
'मंजुम्मल बॉईज'च्या निर्मात्यांना कॉपीराइट नोटीस (Ilaiyaraaja (Left), Manjummel Boys Film Poster (Right) (Image source: ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 10:22 AM IST

मुंबई - Manjummel Boys : 'मंजुम्मल बॉईज' हा सर्व्हायव्हल थ्रिलर चित्रपट सौबिन शाहीर आणि श्रीनाथ भासी यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या कथानकात घडलेलं रेस्क्यू ऑपरेशन, त्यातील पात्रांनी साकालेल्या भूमिका सध्या कुतुहलाचा विषय असला तरी यात वापरण्यात आलेलं 'गुना' या तमिळ चित्रपटातील 'कन्मणी अनबोडू कादलन' हे गाणं परवानगी न घेता वापरल्याबद्दल संगीतकार इलैयाराजा नाराज झाले आहेत. त्यांची परवानगी न घेता गाण्याचा वापर केल्याबद्दल त्यांनी 'मंजुम्मल बॉईज'च्या निर्मात्यांना नोटीस दिली आहे.

'मंजुम्मल बॉईज' चित्रपट हा 11 मित्रांची गोष्ट आहे. हे जीवलग मित्र कोडाइक्कनालला सहलीसाठी जातात. येथील सर्व लोकेशन्स पाहिल्यानंतर त्यातील एक मित्र त्यांना 'गुना केव्हज' पाहायचं राहिल्याचं सांगतो. 1991 मध्ये 'गुना' या कमल हासनची भूमिका असलेल्या चित्रपटाचं शूटिंग याच ठिकाणं झालेलं असतं. उत्साहाच्या जोमात असलेला हा मित्रांचा गट सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून गुहेत उतरतो आणि त्यातील एक तरुण खोल खड्यात पडतो आणि या घटनेला गंभीर वळण मिळते. त्या मित्राला वाचवण्यासाठी सर्वजण अनेक अडचणीशी सामना करतात या कथेभोवती चित्रपट फिरतो.

संपूर्ण चित्रपटात 'गुना' चित्रपटाचा नायक कमल हासनचे अनेक संदर्भ येऊन जातात. याशिवाय 'मंजुम्मल बॉईज' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'गुना' चित्रपटातील 'कानमणी अनबोडू कादलन' हे गाणं महत्त्वाच्या प्रसंगी वापरलं आहे. या वापरामुळे आता इलैयाराजा यांनी निर्मात्यांना कॉपीराइट नोटीस पाठवली आहे.

'मंजुम्मल बॉईज' चित्रपटात 'कन्मणी अनबोडू कादलन' हे गाणं त्यांच्या संमतीशिवाय वापरण्यात आल्याचा दावा प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी केला आहे. याआधी एका यूट्यूब पत्रकारानं या वर्षीच्या मार्चमध्ये 2018 चा रोमँटिक चित्रपट '96' साठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक प्रेम कुमार यांच्यावर असाच आरोप लावला होता. पत्रकारानं असा दावा केला की '96' किंवा 'मंजुम्मल बॉईज' या दोन्ही चित्रपटांमध्ये इलैयाराजा यांची गाणी वापरण्याची परवानगी घेतली नव्हती. असं असलं तरी प्रेम कुमार यांनी या दाव्यांचं खंडन केलं होतं. असं सांगितलं जातं की या दोन्ही चित्रपटात्या निर्मात्यांनी थिंक म्युझिक आणि इतर रेकॉर्ड फर्म्सद्वारे इलैयाराजाची गाणी वापरण्यास संमती मिळवली होती. इलैयाराजा हे महान संगीतकार आहेत, त्यांची गाणं ऐकतंच अनेक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत.

हेही वाचा -

  1. शाहरुख खानला लागला उन्हाचा चटका, अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल - SHAH RUKH KHANS HEALTH DETERIORATED
  2. 'वेलकम 3'मध्ये 200 घोड्यांसह ॲक्शन सीन आणि 500 ​​नर्तकांसह केलं गाणं शूट - WELCOME 3
  3. अनिल आणि फराहनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ला केलं हायजॅक, पाहा प्रोमो... - The Great Indian Kapil Show

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.