मुंबई - Prakash Jha on boycott culture : चित्रपट आणि शोचे भवितव्य त्यांच्या आशयावरून ठरवले जाते, आशय चांगला नसेल तर कितीही मोठा चित्रपट असला तरी तो चालत नाही. चित्रपटावर बहिष्कार घालून चित्रपट यशस्वी किंवा अपयशी ठरत नाही, असे मत चित्रपटाचे निर्माते प्रकाश झा यांनी व्यक्त केलंय.
एएनआयशी बोलताना, प्रकाश झा यांनी बहिष्कार संस्कृतीबद्दल त्यांचे विचार शेअर केले. अलीकडच्या काळात आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' आणि शाहरुख खानचा 'पठाण' या चित्रपटांना बहिष्काराचा सामना करावा लागला आहे. 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसवर काम करू शकला नाही, तर 'पठाण' ब्लॉकबस्टर ठरला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.
बॉलिवूड चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या वाढत्या संस्कृतीच्या परिणामावर आपले मत मांडताना प्रकाश झा म्हणाले, "ट्रोल करणाऱ्या लोकसंख्येपैकी फक्त 5 टक्के लोक आहेत. सोशल मीडियावर असलेल्यांना घाबरण्याची काय गरज आहे. लोक म्हणतात की, या चित्रपटावर बहिष्कार टाका किंवा शाहरुख खानच्या चित्रपटावर बहिष्कार घाला, पण असे झाले का? जर एखादा चित्रपट चांगला बनला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरित्रही चालत नाही. मला वाटते की विवेक ओबेरॉयचा चित्रपट खूप चांगला आणि माहितीपूर्ण होता. पण काय झाले ते तुम्ही पाहू शकता. पीएम मोदींनी त्या चित्रपटाचे कौतुक केले, पण तरीही तो चालला नाही," असे प्रकाश झा म्हणाले.
आशयावर आधारित चित्रपटांबद्दल बोलत असताना प्रकाश झा यांनी '12th फेल'चे कौतुक केले. गेल्या वर्षीच्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी हा एक चित्रपट होता ज्याने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. विक्रांत मॅसीची भूमिका असलेला हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा बाळगून त्यासाठी कठोर परिश्रम केलेल्या तरुणाची कथा होती. भक्कम आणि आशयघन कथानकामुळे चित्रपटाला पाठबळ मिळाले आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने चाहत्यांकडून तसेच बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहऱ्यांकडून प्रशंसा मिळवली.
"कोणालाही याची अपेक्षा नव्हती, परंतु '12th फेल' यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना जोडले गेले. सोशल मीडियावर ट्रोलिंगने काही फरक पडत नाही," असं प्रकाश झा पुढे म्हणाले.
हेही वाचा -