ETV Bharat / entertainment

हुमा कुरेशीनं 'गुलाबी' चित्रपटाच्या सेटवरून केले फोटो शेअर, पाहा पोस्ट - huma qureshi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 4:40 PM IST

Huma Qureshi : हुमा कुरेशी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती महिला ऑटो-रिक्षा चालकाच्या भूमिकेत दिसत आहे.

Huma Qureshi
हुमा कुरेशी

मुंबई - Huma Qureshi : 'महाराणी'मधून लोकप्रिय झालेल्या हुमा कुरेशीला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिनं अनेक चित्रपटांमध्ये आणि वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. 'महाराणी' वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय करून तिनं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिला अनेक चित्रपटांच्या आणि वेब सीरीजच्य आता ऑफर्स येऊ लागल्या आहेत. अलीकडेच तिनं तिच्या नवीन प्रोजेक्टवर काम करणं सुरू केलं आहे. आज सोमवारी 15 एप्रिल रोजी हुमानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पेजवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या आगामी चित्रपट 'गुलाबी'च्या सेटवरचे आहेत. तिनं तिच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा करत पोस्टवर लिहिलं, ''गुलाबी' इज हिअर.''

Huma Qureshi
हुमा कुरेशी

हुमा कुरेशी 'गुलाबी' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र : हुमानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती दिग्दर्शक विपुल मेहता आणि निर्माता विशाल राणा यांच्याबरोबर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. विपुल मेहता यांनी महिला दिनाच्या निमित्त्यानं या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट एका धाडसी महिला ऑटो-रिक्षा चालकाच्या सत्यकथेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये एक महिला रोजच्या जीवनामध्ये किती संघर्ष करते हे दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना विशाल राणा यांनी म्हटलं की, ''आज अहमदाबादमध्ये 'गुलाबी'चे शूटिंग सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रेक्षकांना आवडेल असा आशय सादर करणे हा या चित्रपटाचा उद्देश आहे.

हुमाची महाराणी वेब सीरीज : हुमा कुरेशी आपल्या कारकिर्दीत खूप सुंदर चित्रपट दिले आहेत. आता ती पुन्हा एकदा पडद्यावर जादू करायला सज्ज झाली आहे. जिओ स्टुडिओ आणि एकेलॉन प्रॉडक्शन प्रस्तुत 'गुलाबी' चित्रपटाचे दिग्दर्शन विपुल मेहता आणि ज्योती देशपांडे आणि विशाल राणा यांनी केलं आहे. हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्या 'महाराणी 3' या लोकप्रिय वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरीजमधील तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. या वेब सीरीजच्या मागील दोन सीझनमध्ये हुमाही दमदार स्टाईलमध्ये दिसली होती. 'महाराणी' वेब सीरीज ही सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली होती.

हेही वाचा :

  1. उर्वशी रौतेलानं जिममधून शेअर केला ज्युनियर एनटीआरबरोबरचा सेल्फी, वाचा युजर्सच्या प्रतिक्रिया - Urvashi Rautela
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ' जगभरात पाचव्या दिवशी करणार 100 कोटींचा टप्पा पार - bade miyan chote miyan
  3. जेलमधून सुटल्यानंतर 22 दिवसांनी एल्विश यादवनं खरेदी केली करोडोंची आलिशान कार, पाहा व्हिडिओ - Elvish Yadav

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.