ETV Bharat / entertainment

War 2 viral pics : 'वॉर 2'च्या सेटवरील हृतिक रोशनचे फोटो लीक - Hrithik Roshan

Hrithik Roshan War 2 viral pics : अभिनेता हृतिक रोशनच्या 'वॉर 2' चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे.

Hrithik Roshan War 2 viral pics
हृतिक रोशनचे वॉर सेटवरील फोटो व्हायरल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 11:50 AM IST

मुंबई - Hrithik Roshan War 2 viral pics : 'फायटर' चित्रपटाच्या यशानंतर हृतिक रोशननं त्याच्या आगामी चित्रपट 'वॉर 2' च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरची दमदार जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांना त्यांच्या शूटिंगसाठी प्रत्येकी 100 दिवस देण्यात आले आहेत. काही सीन्स दोन्ही स्टार्स एकत्र करणार आहेत. याशिवाय काही सीन्स हृतिक आणि ज्युनियर एनटीआर चित्रपटामधील सोलो करणार आहेत. दरम्यान, हृतिकनं त्याच्या काही सीन्सची शूट करण्यास सुरुवात केली आहे. आता या शूटिंग सेटवरील हृतिक रोशनचे रक्ताने माखलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Hrithik Roshan War 2 viral pics
हृतिक रोशनचे वॉर सेटवरील फोटो व्हायरल

हृतिक रोशन फोटो सोशल मीडियावर व्हायरल : शूटिंग सेटवरून व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये हृतिक रोशन आक्रमक भूमिकेत दिसत आहे. या फोटोमध्ये हृतिकनं काळ्या रंगाचा पोशाख घातलेला दिसत आहे. यात त्याचे कपडे फाटलेले आहेत. कपाळावर एक जखम आहे, ज्यातून रक्त वाहत आहे. या व्हायरल फोटोंमध्ये हृतिक रोशनचा स्लिम फिट लूक दिसतोय. 'वॉर' चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं होतं. आता 'वॉर 2' या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. या चित्रपटामध्ये हृतिक अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

Hrithik Roshan War 2 viral pics
हृतिक रोशनचे वॉर सेटवरील फोटो व्हायरल

ज्युनियर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत दिसेल ? : ज्युनियर एनटीआर 'वॉर 2' मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी खूप दिवसांपासून चर्चेत आहे. पण चित्रपटात एनटीआर एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाविषयी अधिक माहिती शेअर केलेली नाही. दरम्यान या जोडीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हृतिक 'फायटर' (25 जानेवारी 2024 रिलीज) मध्ये दिसला होता. पुढं तो 'क्रिश 4'मध्ये दिसणार आहे. जूनियर एनटीआर 'आरआरआर' (22 मार्च 2022) मध्ये दिसला होता. आता पुढं तो 'देवरा पार्ट 1' या चित्रपटात दिसणार आहे, जो सप्टेंबरमध्ये प्रदर्शित बॉक्स ऑफिसवर रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. "ते माझ्या हृदयाच्या जवळचे लोकेशन होते": 'मडगाव एक्स्प्रेस' गोव्यातच का शूट केले याचा कुणाल खेमूने केला खुलासा
  2. Pulkit Kriti Wedding Details: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकणार लग्नबेडीत; पाहा लग्नामधील विधीचा तपशील
  3. झी सिने अवॉर्ड्समध्ये किंग खानची धुम; 'जवान'नं मारली बाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.