ETV Bharat / entertainment

'फायटर'साठी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणने घेतली मोठी रक्कम - Hrithik Roshan

Hrithik Deepika Fighter Fees: हृतिक रोशन आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी सिद्धार्थ आनंदच्या 'फायटर' या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 12:13 PM IST

मुंबई - Hrithik Deepika Fighter Fees: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा नवा चित्रपट फायटर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 250 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिसत आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या एरियल अ‍ॅक्शन ड्रामाने पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका नवीन रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हृतिक रोशन हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक म्हणून समोर आला आहे. या चित्रपटासाठी त्याने आणि दीपिकाने मोठी रक्कम घेतल्याचे सांगितले जाते. या दोघांनी भारतीय हवाई दलात पायलटची भूमिका साकारली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशन एका चित्रपटासाठी 75 ते 100 कोटी रुपये घेतो. दीपिका पदुकोणनेही या चित्रपटासाठी खूप शुल्क आकारले आहे. रिपोर्टनुसार, दीपिकाने फायटरसाठी जवळपास 20 कोटी रुपये चार्ज केले आहेत. अनिल कपूरलाही या चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन मिळाल्याचा दावा केला जात आहे. तथापि, ईटीव्ही भारत या दाव्यांची पुष्टी करत ​​नाही.

25 जानेवारीला फायटर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. गेल्या 6 दिवसांत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर अंदाजे 140 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने परदेशात 225 कोटींचा व्यवसाय केला आहे.

कामाच्या आघाडीवर हृतिक रोशनने त्याच्या यशस्वी सुपरहिरो फ्रँचायझी क्रिशच्या चौथ्या भागासाठी स्क्रिप्ट फायनल केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2024 च्या पहिल्या सहामाहीत सुरू होणार आहे. या चित्रपट फ्रेंचायझीची सुरुवात 'कोई... मिल गया' चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाच्या चौथ्या भागाची प्रतीक्षा आता प्रेक्षक करत आहेत. या चित्रपटातून प्रियांका चोप्रा तिच्या भूमिकेत पुनरागमन करु शकते. हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असलेल्या 'वॉर' यशस्वी फ्रेंचायझीच्या चाहत्यांना आगामी भागासाठी 2025 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटात खलनायक म्हणून ह्रतिकच्या विरोधात ज्यनियर एनटीआरला कास्त करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. हा चित्रपट ज्यु. एनटीआरचा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 2025 च्या स्वातंत्र्य दिनाला प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा -

  1. जंगी स्वागतानंतर घरी परतलेल्या मुनावर फारुकीच्या मुलांनं केलं बाबाचं कौतुक
  2. शाहिद कपूरची क्लिप पाहून तुम्हीही रोखू शकणार नाहीत हसू, पाहा व्हिडिओ
  3. 'चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र' पुरस्कार सोहळ्याला मनोज बाजपेयी, सुनील गावस्करसह दिग्गजांची हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.