ETV Bharat / entertainment

हनी सिंगनं बेस्ट फ्रेंड सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं दिलं आश्वासन - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING

Honey Singh On Sonakshi Sinha Wedding: हनी सिंगनं सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची पुष्टी केली आहे. लग्नाला तो नक्की येणार असल्याचं त्यानं पोस्ट शेअर करून आश्वासनही दिलंय.

Honey Singh On Sonakshi Sinha Wedding
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल हनी सिंग केली पोस्ट (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 5:16 PM IST

मुंबई - Honey Singh Post : हिंदी चित्रपटसृष्टीची 'लेडी दबंग' सोनाक्षी सिन्हाचा तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. सोनाक्षी आणि झहीर 23 जूनला लग्न करणार असल्याचं समजत आहेत. आतापर्यंत लग्नाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता रॅपर हनी सिंगनं सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाची बातमी खरी असल्याचं सिद्ध केलं आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो नक्कीच सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचं म्हणत आहे.

Honey Singh On Sonakshi Sinha Wedding
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल हनी सिंग केली पोस्ट (हनी सिंग (IMAGE- IANS))

हनी सिंगनं सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल केली पोस्ट : हनी सिंगनं काल रात्री एक इन्स्टास्टोरी शेअर करत लिहिलं, "मी माझे पहिले गाणे लंडनमध्ये शूट करणार आहे, मात्र मी तुम्हाला खात्री देतो की, मी माझी सर्वात चांगली मैत्रीण सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात नक्की येईन, कारण तिनं माझ्या करिअरमध्ये आणि कठीण काळात मदत केली आहे. सोना आणि झहीर या जोडप्याला माझ्या शुभेच्छा, भोलेनाथचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहो." आता ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकजण सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. याआधी सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं, मात्र त्यांना याबाबत काही माहित नसल्याचं सांगितलं होतं.

हनी सिंग आणि सोनाक्षी सिन्हाचं गाणं : सोनाक्षी सिन्हा हनी सिंगच्या 'देसी कलाकार' या हिट गाण्यात दिसली होती. हे गाणे खूप गाजलं आणि या गाण्यात सोनाक्षी आणि हनी सिंगच्या जोडीलाही खूप पसंती मिळाली होती. दरम्यान हनी सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं त्याचे अनेक अल्बम हिट झाले आहेत. यात 'लव डोज', 'लुंगी डांस', 'ब्लू आइज', 'छोटे छोटे पैग','चार बोतल वोडका', 'मखना' ,'धीरे धीरे' आणि इतर गाण्यांचा समावेश आहेत. हनी सिंग हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याचे इंस्टाग्रामवर 13.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकदा तो आपले फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.

हेही वाचा :

  1. 'ये रिश्ता क्या कहलाता है', पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनींच्या सेल्फीनंतर चर्चांना उधाण - PM MELONI SELFIE WITH PM MODI
  2. शरद पवारांनी माझं चुटकीसरशी केलं काम, अशोक सराफरांनी सांगितली 'खास' आठवण... - ashok saraf
  3. 'चंदू चॅम्पियन' आणि 'मुंज्या' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन, जाणून घ्या... - chandu champion Movie and Munjya

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.