ETV Bharat / entertainment

पहिल्या मुलाच्या स्वागतानंतरच्या पहिल्या पोस्टमध्ये अनुष्का शर्मानं दिल्या होळीच्या शुभेच्छा - Anushka Sharma Holi Wishes - ANUSHKA SHARMA HOLI WISHES

Anushka Sharma Holi Wishes : अनुष्का शर्मानं गेल्या महिन्यात दुसऱ्या मुलाचा जन्म दिल्यानंतर ही बातमी चाहत्यांना सोशल मीडियावरुन दिली होती. त्यानंतर ती या माध्यमावर सक्रिय नव्हती. होळीच्या निमित्तानं शुभेच्छा देत ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.

Anushka Sharma Holi Wishes
अनुष्का शर्मानं दिल्या होळीच्या शुभेच्छा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 11:44 AM IST

मुंबई - Anushka Sharma Holi Wishes : गेल्या महिन्यात अकाय या मुलाला जन्म दिल्यानंतर अनुष्का शर्मानं ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना कळवली होती. आता तिने चाहत्यांना आणि फॉलोअर्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन मुलांची आई असलेली अनुष्का शर्मा गेला एक महिना सोशल मीडियावर निष्क्रिय होती तिने अखेर होळीच्या शुभेच्छा देत पुन्हा एकदा या अभासी जगात परत प्रवेश केला आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 15 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचा मुलगा 'अकाय'चे स्वागत केले होते. पाच दिवसांनंतर या जोडप्याने संयुक्त पोस्टच्या माध्यामातून अकायच्या जन्माची घोषणा केली होती. नवजात मुलाची आई असल्यानं या काळात अनुष्का सोशल मीडियावर निष्क्रिय होती. अखेर यंदाच्या होळीच्या निमित्ताने तिनं आपली उपस्थिती पुन्हा दर्शवली आहे. अनुष्काने होळीच्या शुभेच्छा देताना रंगांने भरलेली ग्राफिकल पोस्ट शेअर केली. तिच्या पोस्टवर तिनं "हॅपी होली" असा मजकूर लिहिलाय.

Anushka Sharma Holi Wishes
अनुष्का शर्मानं दिल्या होळीच्या शुभेच्छा

कामाच्या आघाडीवर अनुष्काने गेल्या डिसेंबरमध्ये तिच्या आगामी चित्रपट 'चकडा एक्सप्रेस'चे शूटिंग पूर्ण केले. हा चित्रपट क्लीन स्लेट फिल्मझ या प्रॉडक्शन बॅनरखाली बनला आहे. या प्रॉडक्शनची सुरुवात अनुष्कानं तिचा भाऊ कर्णेश शर्मा बोरबर केली होती. आपल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मार्च 2022 पासून ती या प्रॉडक्शनच्या कामकाजापासून दूर गेली होती.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो चित्रपटानंतर अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यापासून दूर आहे. आता तिने खूप काळानंतर चकडा एक्सप्रेस हा चित्रपट स्वीकारला. क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित असलेला हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट नेटफ्लिक्सच्या सहकार्याने डिजिटल उपक्रम म्हणून निर्मिती करण्यात आला आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन कधी होणार याची चाहते प्रतीक्षा करत आहेत.

प्रॉसिट रॉय दिग्दर्शित 'चकडा एक्सप्रेस' हा झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स बायोपिक केवळ नेटफ्लिक्सवर प्रवाहित होईल. क्रिकेट खेळण्याचे तिचे एकमेव स्वप्न पूर्ण करण्यासाठी असंख्य अडथळ्यांना न जुमानता ही वेगवान गोलंदाज कसा संघर्ष करते याचं चित्रण यात पाहायला मिळणार आहे. भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवलेली झुलन गोस्वामी ही देशातील महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंसाठी एक आदर्श आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रम तिच्या नावावर आहे.

हेही वाचा -

  1. बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत सेलेब्रिटींची मांदियाळी, सलमान-इमरानपासून प्रिती झिंटापर्यंत तारे तारकांची हजेरी - Baba Siddiqui Iftar Party
  2. एक्स पतीच्या निकाहानंतर राखी सावंतनं शेअर केला वधू वरांच्या पोशाखातील माकडांचा फोटो - Rakhi sawant and Adil khan
  3. पवन कल्याण आणि 'ओजी' टीमनं इमरान हाश्मीच्या वाढदिवसानिनित्त पोस्टर केलं रिलीज - OG New Poster of Emraan Hashmi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.