ETV Bharat / entertainment

ब्रेस्ट कॅन्सरच्या लढाईत शक्ती मिळावी यासाठी हिना खाननं केली 'अल्लाह'ला प्रार्थना - Hina Khan - HINA KHAN

Hina Khan : ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असलेली टीव्ही अभिनेत्री हिना खानच्या नव्या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. हिना खान तिच्या पोस्टमध्ये अल्लाहकडे मदत मागताना दिसत आहे.

Hina Khan
हिना खान (हिना खान (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 2:21 PM IST

मुंबई - Hina Khan Breast Cancer : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे चर्चेत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर तिनं ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. हिना खानला थर्ड स्टेज ब्रेस्ट कॅन्सर आहे हे जाणून अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला. तेव्हापासून सेलेब्स आणि हिना खानचे चाहते ती लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. नुकतीच हिनानं तिच्या केमोथेरपीबद्दल माहिती दिली होती. हिना खानच्या नुकत्याचं केलेल्या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढवल्या आहेत. हिनानं 10 जुलैच्या रात्री तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिलं, "अल्लाह शिवाय तुमचे दु:ख कोणीही समजू शकत नाही."

हिना खाननं सांगितलं होतं केमोथेरपीबद्दल : या पोस्टमध्ये हिना खान चिंतेत दिसत आहे. हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल सुद्धा खूप काळजीत आहे, पण तो हिना बाबतची हिंमत हारलेला नाही. हिना खानला कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे. या पोस्टपूर्वी हिना खाननं एक व्हिडिओ शेअर केला होता, यात ती शॉर्ट हेअरकट करताना दिसत होती. पोस्टद्वारे तिनं तिच्या केमोथेरपीबद्दल माहिती दिली होती. याशिवाय एका फोटोंमध्ये केमोथेरपीदरम्यान हिना खानच्या शरीरावर काही कटही दाखवण्यात आले होते.

तिसऱ्या स्टेजचा कर्करोग : हिना खाननं स्वतः तिच्या पोस्टमध्ये सांगितलं होतं की, "कॅन्सरच्या उपचारादरम्यान माझ्या शरीरावर काही जखमा झाल्या होत्या." त्यानंतर चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं होतं आणि तिला काळजी घेण्यास सांगितलं होतं. 36 वर्षीय हिना खाननं 28 जून रोजी तिच्या कॅन्सरची बातमी उघड केली होती. यामध्ये हिनानं तिला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं सांगितलं होतं आणि यानंतर तिच्यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करण्याचं आवाहन तिनं केलं होतं. हिना खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती, 'हॅक' आणि 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

हेही वाचा :

  1. टीव्ही अभिनेत्री हिना खाननं केमोथेरपीनंतर कापले केस, केली भावनिक पोस्ट शेअर - HINA KHAN HAIR CUT

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.