मुंबई - Himesh Reshammiya : हिंदी संगीत उद्योगातील उत्तम संगीत दिग्दर्शक, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियानं त्याच्या 14 वर्षांच्या फिल्मी करिअरमधील 10व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यानं त्याच्या 51 व्या वाढदिवशी 'जानम तेरी कसम' या नवीन चित्रपटाची घोषणा केली. हिमेशनं 23 जुलै रोजी त्याचा 51वा वाढदिवस साजरा केला. 'जानम तेरी कसम' चित्रपटाची घोषणा केल्यानंतर एक पोस्टर आणि गाण्याचा टीझर देखील रिलीज केला गेला आहे. हिमेशनं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केल्यानंतर त्याचे चाहते खुश आहेत. त्यानं शेअर केलेल्या पोस्टरवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
'जानम तेरी कसम' चित्रपटाचं टायटल ट्रॅक : 'जानम तेरी कसम'चं टायटल ट्रॅक हा खूप दु:खद आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकाना प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट राधिका राव आणि विनय सप्रू हे बनवत आहेत. 2025 च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर 'जानम तेरी कसम' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती हिमेश रेशमियानं केली आहे. हिमेशनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दलची माहिती दिली आहे. 'जानम तेरी कसम'चा टायटल ट्रॅक हिमेशनं शेअर करून त्याच्या चाहत्यांना एक सप्राईज दिलंय. याशिवाय हिमेशनं चाहत्यांना विनंती केली आहे की, या गाण्यावर रील बनवून शेअर करवा. हिमेशनं देखील पत्नी सोनिया कपूरबरोबर या गाण्यावर एक रोमँटिक रील बनवून शेअर केला आहे.
हिमेश रेशमियाचे चित्रपट : हिमेशनं 2007 मध्ये 'आप का सुरूर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय त्यानं 'कर्ज' चित्रपटात देखील काम केलं आहे. 2009 मध्ये' रेडिओ', 2010 मध्ये 'कजरारे', 2011 मध्ये 'दमादम', 2014 मध्ये 'द एक्सपोज', 2016 मध्ये 'तेरा सुरूर' आणि 2020 मध्ये 'हॅपी हार्डी ॲन्ड हीर' या चित्रपटामध्ये त्यानं काम करून प्रेक्षकांच मनोरंजन केलंय. हिमेशच्या आगामी चित्रपटांमध्ये 'बदास रवि कुमार' आणि 'जानम तेरी कमस' यांचा समावेश आहे. 'बदास रवि कुमार' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 1 ऑक्टोबर रोजी चालू वर्षात रिलीज होणार आहे.