ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन ते अनन्या पांडे या सेलिब्रिटींनी वडिलांना दिल्या 'फादर्स डे'निमित्त शुभेच्छा - Happy Fathers Day 2024 - HAPPY FATHERS DAY 2024

'Father's Day 2024: 'फादर्स डे' 2024 च्या निमित्तानं बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत अनेक स्टार्सनी त्यांच्या वडिलांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. आज हा दिवस अनेकजण साजरा करताना दिसत आहेत.

Fathers Day 2024
फादर्स डे 2024 (फादर्स डे 2024 (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 4:09 PM IST

मुंबई - Celebs On Fathers Day 2024 : आज 16 जून रोजी 'फादर्स डे'च्या शुभ प्रसंगी अर्जुन कपूर, अल्लू अर्जुन, नयनतारा, अनन्या पांडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रिटींनी वडिलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना खास पद्धतीचा मॅसेज आपल्या वडीलांना दिला आहे. निर्माता करण जोहरनं इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात त्यानं वडील यश जोहर यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोमध्ये तो मुलगा यश आणि रुही जोहरबरोबर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना त्यानं कॅप्शन लिहिलं की, "माझ्या आयुष्यातील प्रत्येक पैलूत नेहमीच मला मार्गदर्शन करणाऱ्या तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद, आता हे सर्व कामात येत आहे. मी देखील एक पिता बनलो आहे."

Fathers Day 2024
फादर्स डे 2024 (instagram - Ananya pandey)
Fathers Day 2024
फादर्स डे 2024 (instagram - arjun kapoor)
Fathers Day 2024
फादर्स डे 2024 (instagram - mrunal thakur)
Fathers Day 2024
फादर्स डे 2024 (instagram - vaani kapoor)
Fathers Day 2024
फादर्स डे 2024 (instagram - allu arjun)

आलिया भट्ट-अल्लू अर्जुनची पोस्ट : आलिया भट्टनं तिच्या आजोबांबरोबरचे तिचे बालपणीचे जुने फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टवर तिनं लिहिलं, "माझे आवडते स्टोरीटेलर , वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबा, तुम्ही आणि तुमच्या कथा नेहमी आमच्या मनात राहतील. अल्लू अर्जुननं वडील अल्लू अरविंद यांचा एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, "जगातील प्रत्येक वडिलांना 'फादर्स डे'च्या शुभेच्छा." दरम्यान वाणी कपूरनं देखील तिच्या वडिलांना 'फादर्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनन्या पांडे आणि अर्जुन कपूरची पोस्ट : अनन्या पांडेनं वडील चंकी पांडेबरोबरचा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये तिनं लिहिलं, "संपूर्ण जगातील सर्वोत्तम बाबा." साऊथ अभिनेत्री नयनतारानं तिचा नवरा विघ्नेश शिवनचा एक सुंदर रील तिच्या मुलांबरोबरचा शेअर करत 'फादर्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुन कपूरनं त्याच्या बालपणीचा फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिलं की, "हा फोटो सर्वकाही सांगते! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाबा! तुम्हाला 'फादर्स डे'च्या शुभेच्छा." याशिवाय शिल्पा शेट्टी, राशि खन्ना, नेहा कक्कर, मीरा राजपूत, वाणी कपूर, मृणाल ठाकूर यांसारख्या स्टार्सनीही 'फादर्स डे'च्या निमित्तानं वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. अभिनेता संजय दत्तनं छत्तरपूर बागेश्वर धामला पोहोचून घेतली पंडित धीरेंद्र शास्त्रींची भेट - sanjay dutt
  2. राम चरण-उपासना कोनिडेनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस, पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना - ram charan upasana
  3. अंकिता लोखंडे आणि तिची सासू रंजना जैनचा मंदिरातील व्हिडिओ व्हायरल, यूजर्सनं केलं ट्रोल - Anikita Lokhande News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.