ETV Bharat / entertainment

'मगधीरा', 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' : राम चरणच्या उत्तुंग कारकिर्दीचा चढता आलेख - Ram Charan Birthday

Ram Charan Birthday : राम चरणच्या वाढदिवसानिमित्त दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील त्याच्या शानदार कारकीर्दीवर एक नजर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 'मगधीरा' चित्रपटातील त्याच्या सुरुवातीच्या यशापासून ते 'रंगस्थलम'मधील परिवर्तनकारी भूमिकेपर्यंत आणि जगभरात गाजलेल्या 'आरआरआर'पर्यंत, राम चरणने सतत तेलुगू सिनेमाचं सीमोल्लंघन केल्याचं दिसतं.

Happy Birthday Ram Charan
राम चरणच्या उत्तुंग कारकिर्दीचा चढता आलेख
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 11:55 AM IST

हैदराबाद - Ram Charan Birthday : तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यापैकी एक राम चरणहासने आजवरच्या त्याच्या अष्टपैलू कामगिरीने दक्षिणेमध्ये स्वतःच एक स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. फिल्म इंडस्ट्रीतील त्याचा प्रवास अनेक संस्मरणीय भूमिका आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांचा आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित 'मगधीरा' या त्याच्या पदार्पणातील भव्य चित्रपटापासून त्याचा सुरू झालेला अभिनय प्रवास 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' चित्रपटातील उत्कृष्ट कलाकारापर्यंत पोहोचलाय. राम चरणच्या कारकिर्दीचा आलेख एक अभिनेता म्हणून त्याची प्रतिभा, समर्पण आणि अष्टपैलुत्वाचा सबळ पुरावा आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये त्यानं स्वतःत सुधारणा केल्या आणि स्वतःला आव्हान देत राहिला. या प्रवासात त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

राम चरण 27 मार्च रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानं तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे. आपली अभिनय कामगिरी सर्वोत्कृष्ट व्हावी यावर त्यानं सातत्यानं भर दिला आहे. 'मगधीरा', 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' या त्याच्या तीन जीवन बदलून टाकणाऱ्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करून त्याच्या कारकिर्दीच्या आलेखावर एक नजर टाकूयात.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मगधीरा: राम चरणला सुपरस्टारपद बहाल करणारा चित्रपट

तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये चिंरजीवी, नंदमुरी बालकृष्णा, नागार्जुन, व्यंकटेश, पवन कल्याण, महेशबाबू आणि अल्लु अर्जुन यांच्यासारखे प्रस्थापित आणि यशस्वी स्टार्सची मांदियाळी असताना 'मगधीरा' चित्रपटाने राम चरणला सुपरस्टार बनवले. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात वेगवेगळ्या कालखंडातील दुहेरी भूमिका साकारत त्यानं तमाम प्रेक्षकांचं लक्ष आपल्या अभिनय क्षमतेनं स्वतःकडं वळवलं. या चित्रपटात राम चरणने काळभैरव आणि हर्षा या व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. अन्यायाविरुद्ध लढणारा आणि सूड उगवणारा शूर योद्धा काळभैरवाच्या भूमिकेनं त्याला मोठी प्रशंसा मिळाली.

यातील राम चरणच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सने आणि उक्तृष्ट अभिनय कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केलं, त्याला प्रशंसा मिळवून दिली आणि त्याला अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख दिली. या चित्रपटातील पिरियड ड्रामाचे ग्राउंडब्रेकिंग व्हिज्युअल इफेक्ट्स, क्लिष्ट कथाकथन आणि एपिक स्केलसाठी कौतुक झालं. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या यशाने विक्रम मोडीत काढले आणि तेलुगू चित्रपटांसाठी नवीन बेंचमार्क सेट केला. मगधीरा चित्रपट राम चरणच्या कारकिर्दीतील केवळ एक मैलाचा दगड नव्हता तर त्याच्या उज्वल भविष्यातील चित्रपटांचा भक्कम पायाच होता.

रंगस्थलम: एक अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रतिष्ठा

आंध्र प्रदेशच्या 1980 च्या दशकातील ग्रामीण पार्श्वभूमीवर सेट केलेल्या या चित्रपटात राम चरण एका नव्या अवतारात पाहायला मिळाला. यातील व्यक्तीरेखा साकारताना त्याला अ‍ॅक्शन नायकाच्या प्रतिमेपासून दूर नेलं. चिट्टी बाबू या मोठं मन असलेल्या अशक्त गावकरी व्यक्तीची भूमिका साकारताना राम चरणनं एक सूक्ष्म आणि भावनिक अभिनय सादर केला. त्याचं समीक्षक आणि प्रेक्षकांनीही भरभरुन कौतुक केलं.

रंगस्थलम चित्रपटामुळे त्याची एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याची प्रतिष्ठा मजबूत झाली. रंगस्थलम हे केवळ व्यावसायिक यशच नव्हते तर अनेक पुरस्कार आणि वाहवा यामुळे त्याला मिळाली. चित्रपटातील ग्रामीण जीवनाचे वास्तववादी चित्रण, आकर्षक कथा, आणि राम चरण यांच्या संस्मरणीय अभिनयानं राम चरणला तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित अभिनेत्याचा दर्जा प्राप्त झाला.

आरआरआरमधील पॉवरहाऊस परफॉर्मन्स

एसएस राजामौलीच्या आरआरआर चित्रपटामध्ये राम चरण पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहिला. 2022 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट महाकाव्य प्रमाणे भव्य दिव्य ठरला. यामध्ये राम चरण आणि ज्यनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या ऐतिहासिक नाट्यमय चित्रपटात, राम चरण याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अल्लुरी सीताराम राजू या क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारली.

चित्रपटाचा भव्य स्केल, आकर्षक कथानक आणि राम चरण आणि त्याच्या सहकलाकारांचे पॉवरहाऊस परफॉर्मन्स ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये होती. या चित्रपटाने नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठीचा 95 वा ऑस्कर पुरस्कार जिंकला. आरआरआर चित्रपटात राम चरणच्या अभिनयाचा सुंदर अविष्कार पाहायला मिळाला. यामध्ये त्यानं प्रेक्षकांवर कायमस्वरूपी प्रभाव टाकणारा परफॉर्मन्स दिला.

राम चरण त्याच्या कारकिर्दीच्या पुढच्या टप्प्यावर जात असताना आज तो तेलुगू सिनेमातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व बनला आहे. आपल्या अष्टपैलूत्वानं त्यानं लाखो लोकांना प्रेरणा दिली आणि फिल्म इंडस्ट्रीवर अमिट छाप सोडली आहे. त्याचे चित्रपटासाठी असलेलं समर्पण, बांधिलकी आणि प्रेम पाहता तो पॉवरहाऊस परफॉर्मर म्हणून आणखीही सर्वोत्कृष्ट देईल यात शंका नाही. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या फिल्म इंडस्ट्रीतील योगदानाचं कौतुक करुयात आणि त्याला यश मिळावं यासाठी शुभेच्छाही देऊयात.

हेही वाचा -

मुनावर फारुकीविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अवैध पदार्थ सेवन करताना घेतलं ताब्यात - Munawar faruqui

"तू कधी 'दिशा' बदलू नकोस" टायगर श्रॉफला अक्षय कुमारचा अनमोल सल्ला - Akshay Kumar advice to Tiger Shroff

नितेश तिवारीच्या 'रामायण'साठी रणबीर कपूर शिकला धनुर्विद्या, कोच बरोबरचे फोटो व्हायरल - Ranbir Kapoor learning Archery

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.