मुंबई Happy Birthday Jeetendra : जीतूजी या नावानं ओळखल्या जाणारा जितेंद्र हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. आजही तो लोकांच्या मनावर राज्य करतो. 70 आणि 80 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर त्यानं अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा डॅशिंग लूक आणि त्याचा डान्स हा अनेकांना आवडत होता. याशिवाय त्याचा अभिनय सुंदर असल्यानं त्याच्यावर अनेकजण जीव ओवाळून टाकत होते. 'जम्पिंग जॅक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचा आज 7 एप्रिल रोजी 75वा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
जितेंद्रचं फिल्मी करिअर : व्ही शांताराम यांच्या 'नवरंग' या चित्रपटातून ज्युनियर आर्टिस्ट म्हणून जितेंद्रनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर बॉक्स ऑफिसवर त्यानं 'फर्ज', 'हमजोली', 'धरम वीर', 'तोहफा', 'कारवां', 'हिम्मतवाला' असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार जितेंद्र यांची भेट त्याच्या पत्नीशी म्हणजेच शोभा सिप्पीबरोबर झाली, तेव्हा त्यांची पत्नी 14 वर्षाची होती. दरम्यान वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी जितेंद्रवर पडली, यानंतर ते आपल्या कामात व्यग्र झाले. त्यानंतर त्याची भेट रेखाबरोबर 'बेचारा' चित्रपटाच्या सेटवर झाली. त्याला रेखा पाहता क्षणी आवडली.
जितेंद्रचं हेमाबरोबरचं लग्न मोडले : रेखानंतर जितेंद्रचं नाव हेमा मालिनी यांच्याशी जोडलं जाऊ लागलं. हेमा त्यावेळी धर्मेंद्रला पसंत करत होती. याशिवाय एका चित्रपटातून जितेंद्रला हेमामुळे काढण्यात आलं होतं. हेमा मालिनी यांच्या 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकानुसार, दोघांमध्ये कधीच प्रेम नव्हते, पण त्यांच्या पालकांची इच्छा होती की त्यांनी लग्न करावं. हेमा मालिनी यांची आई जया चक्रवर्ती यांची स्वतःची इच्छा होती की त्यांच्या मुलीनं धर्मेंद्रऐवजी जितेंद्रशी लग्न करावं. एवढेच नाही तर त्यांनी हेमाचं जितेंद्रबरोबर लग्नही निश्चित केलं होतं. जितेंद्र आणि हेमा चेन्नईत लग्न करणार होते, मात्र त्यांंचं लग्न धर्मेंद्र यांनी मोडलं. यानंतर जितेंद्रनं आपल्या मैत्रिणीबरोबर म्हणजेच शोभाबरोबर लग्न केलं. लग्नानंतर देखील जितेंद्रचं नाव श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्याशी जोडलं गेलं होतं.
हेही वाचा :