मुंबई - Arijit Singh Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक असलेला अरिजित सिंग आज 25 एप्रिल रोजी 37वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या जादुई आवाजाद्वारे तो लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अरिजित सिंगनं अनेक चित्रपट आणि अल्बमसाठी गाणी गायली आहेत. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. अरिजित सिंगला इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. त्यानं रिॲलिटी शोमधून संगीत जगतात पाऊल ठेवलं होतं. रिपोर्ट्सनुसार, अरिजितनं 2005 मध्ये 'फेम गुरुकुल' या सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता.
अरिजित सिंगचा वाढदिवस : अरिजित सिंगचा आवाज हा शंकर महादेवन आणि केके यांना खूप आवडला होता. या शोमध्ये त्याला कमी मत मिळाल्यामुळे बाहेर पडावे लागले. या शोमधून बाहेर पडल्यानंतर त्यानं हार मानली नाही, तो मेहनत करत राहिला. यानंतर अरिजितला 2010 मध्ये 'तोसे नैना' हा म्युझिक अल्बम मिळाला. या पहिल्या अल्बमनं त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर अरिजित सिंगचे नशीब चमकले. 2011 मध्ये 'मर्डर 2' या चित्रपटामधून अरिजीतनं पार्श्वगायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्याला 'आशिकी 2'मधील काही गाणे गाण्याची संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोन केलं आणि त्यानं चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं.
अरिजित सिंगचा साधेपणा : अरिजित सिंगनं आपल्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे. अरिजितला चाहतेही पार्श्वगायनाचा बादशाह म्हणतात. त्याचा साधेपणा हा अनेकांना आवडतो. यासाठी त्याचे अनेकजण कौतुक देखील करतात. करोडो रुपये घेणाऱ्या अरिजित अनेकदा साधे कपडे आणि चप्पल घालून बाहेर जाताना दिसतो. अरिजित सिंग हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तो आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो अनेकदा चाहत्याबरोबर शेअर करत असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर 10.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. दरम्यान अरिजित वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याचा दुबईमध्ये 27 एप्रिल रोजी एक म्युझिक कॉन्सर्ट आहे.
पुरस्कार : अरिजित सिंगला त्याच्या सुरेल आवाजासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याला 5 मिर्ची म्यूजिक पुरस्कार, 7 फिल्मफेअर पुरस्कार, 5 झी सिने पुरस्कार, 5 आयफा पुरस्कार, 4 स्क्रीन पुरस्कार आणि 1 स्टारडस्ट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानं सलग 5 वर्षे, 2016 ते 2020मधील फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
हेही वाचा :
- अभिनेत्री तमन्ना भाटियाला आयपीएलच्या अवैध स्ट्रीमिंग प्रकरणी सायबर पोलिसांचं समन्स - tamannaah bhatia
- लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाल्यानंतर रणदीप हुड्डानं केल्या भावना व्यक्त - Randeep Hooda
- 'हीरामंडी' प्रीमियरमध्ये अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ दिसले एकत्र, व्हिडिओ व्हायरल - ADITI RAO HYDARI AND SIDDHARTH