ETV Bharat / entertainment

आरती सिंहच्या हळदी समारंभामधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - Arti singh Haldi - ARTI SINGH HALDI

Arti singh Haldi: आरती सिंहनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आता तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.

Arti singh Haldi
आरती सिंहची हळद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 3:18 PM IST

मुंबई - Arti singh Haldi: 'बिग बॉस 13' ची स्पर्धक असलेली आरती सिंह 25 एप्रिलला लग्न करणार आहे. आता सध्या तिच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिच्या ब्राइडल शॉवरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते. आता तिनं तिच्या हळदी समारंभामधील झलक शेअर केली आहे. मंगळवारी 23 एप्रिल रोजी आरतीनं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हळदी समारंभाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. रेड हार्ट इमोजीबरोबर तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''सर्वात सुंदर रंग. हळदीचा रंग, माझ्या प्रेमाचा रंग." आरतीनं तिच्या हळदीच्या समारंभासाठी रंगीबेरंगी हिरवा लेहेंगा निवडला होता, जो तिनं गुलाबी रंगाच्या स्टायलिश ब्रॅलेट चोलीबरोबर मॅच केला होता.

आरती सिंहचा हळदी समारंभ : आरती सिंहनं तिनं हातात फुलांची माळ घातली होती. ग्लोइंग मेकअप आणि हाफ टाय हेअरस्टाइलनं तिनं तिचा तिचा लूक पूर्ण केला. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. आरतीच्या हळदी समारंभामधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये आरतीचा भाऊ कॉमेडियन कृष्णा अभिषेक बहिणीच्या आनंदात खूप सुंदर डान्स करत आहे. कृष्णाची पत्नी कश्मिरा शाह देखील हळदीच्या समारंभाचा आनंद लुटताना दिसत आहे. आता आरतीला अनेकजण तिच्या लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. आरती उद्योगपती दिपक चौहानबरोबर लग्न करत आहे. तसेच एका दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आरती तिच्या तिच्या होणाऱ्या पतीबरोबर सुंदर डान्स करत आहे.

आरती सिंहच्या हळदी समारंभातील फोटो व्हायरल : याशिवाय दीपक हा डान्स करताना आरतीच्या गालाची किस घेऊन तिला उचलून या खास क्षणाचा आनंद घेत आहे. तसेच सोशल मीडियावर काही फोटो देखील आता समोर आले आहेत. एका व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये आरती ही कृष्णा, कश्मिराबरोबर पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर दीपक देखील दिसत आहे. आता सध्या आरतीचं लग्न खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. ज्येष्ठ गायिका उषा उथुप यांनी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल केला आनंद व्यक्त - Usha Uthup
  2. हृतिक रोशनचा डान्स बघून मनोज वाजपेयीच्या नृत्य करण्याच्या स्वप्नाचा झाला चुराडा - MANOJ BAJPAYEE
  3. श्रद्धा कपूरनं ज्वेलरी शॉपमध्ये सेल्सवुमन म्हणून केलं काम, व्हिडिओ व्हायरल - Shraddha Kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.