ETV Bharat / entertainment

'घुंगराची चाळ' गाण्याचा टीझर रिलीज; पाहा व्हिडिओ - घुंगराची चाळचा टीझर रिलीज

Ghungarachi chaal Teaser Out : 'घुंगराची चाळ' या मराठी गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये मराठी कलावंताचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.

Ghungarachi chaal Teaser Out
घुंगराची चाळ गाण्याचा टीझर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Ghungarachi Chaal Teaser Out : मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. 'घुंगराची चाळ' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टीझर हा सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कलासंस्कृतीचं नव्या पद्धतीनं दर्शन घडवण्यासाठी नवीन मराठी कलाकारांना संधी दिली जात आहे. दरम्यान रिलीज झालेल्या टीझरमध्ये लोक कलावंताच्या जगण्याची कहाणी दाखवली आहे. या गाण्याचे निर्माते निलेश मुणगेकर आहेत. 'घुंगराची चाळ'मध्ये किरण कोरे, सुरेखा पुणेकर, निकिता भोरपकर हे कलाकार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'घुंगराची चाळ' गाण्याचा टीझर रिलीज : या गाण्याचे निर्माते निलेश मनोहर मुणगेकर मराठी कलावंतविषयी सांगतात, ''कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं. हाच माझा कायम हेतू आहे. कोणताही कलाकार हा छोटा आणि मोठा नसतो. छोटे असतात ते आपले विचार. म्हणून आपण काळासोबत आपले विचार बदलायला हवेत. मी आत्तापर्यंत नवनवीन कलाकारांसाठी 100 हून अधिक फॅशन शो, शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम यांची निर्मिती केली आहे. यापुढे ही करत राहणार आहे. आपल्या मराठी कलावंतांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. मराठी कलावंतच्या सर्वच कलाविष्कारांवर प्रेक्षकांचं असंच प्रेम कायम असो. हीच सदिच्छा!!”

मराठी कलाकारांचा संघर्ष : दिग्दर्शक दर्शन घोष नव्या गाण्याविषयी सांगतात, ''सध्याच्या सोशल मीडियाच्या ट्रेंडींग जगात हिंदी, इंग्रजी गाण्यांसोबतचं मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत वेगवेगळे बदल होत आहेत. परंतु या स्पर्धात्मक जगात आपल्या महाराष्ट्रातील लोकसंगीत सादर करणाऱ्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी कलावंत मराठीची संपूर्ण टीम कार्यरत आहे. आमच्या पहिल्या 'शंकर बाबा' गाण्याच्या यशानंतर आम्ही 'घुंगराची चाळ' हे नवं गाणं घेऊन येत आहोत. या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच या गाण्याची उत्सुकता असल्याचे प्रेक्षक कमेंट्स करून सांगत आहेत. हे पाहून खरचं आनंद गगनात मावत नाही आहे.'' या गाण्यामध्ये एका कलाकाराचा संघर्ष दाखवला गेला आहे. 'घुंगराची चाळ' हे भावनिक गाणं आहे.

हेही वाचा :

  1. आयुष्याच्या राईडमध्ये साथ दिल्याबद्दल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराने दिल्या एकमेकांना शुभेच्छा
  2. रोमँटिक हिरोच्या भूमिकेत अहान पांडेचे होणार पदार्पण, मोहित सूरी करणार दिग्दर्शन
  3. छत्रपती संभाजी महाराजांच्या अजेय पराक्रमाची गाथा 'शिवरायांचा छावा'चा ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.