ETV Bharat / entertainment

शाहरुख पत्नी गौरीला फराह खाननं दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा - GAURI KHAN BIRTHDAY

GAURI KHAN BIRTHDAY : चित्रपट निर्माती फराह खानने शाहरूखची पत्नी गौरी खानला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. फराह ही शाहरुखची खास मैत्रीण आहे.

Gauri Khan Birthday
गौरी खान आणि फराह खान ((ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 8, 2024, 1:25 PM IST

Updated : Oct 11, 2024, 2:02 PM IST

मुंबई - शाहरुख खानची प्रिय पत्नी गौरी खान आज ८ ऑक्टोबरला आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी तिच्यावर फिल्म इंडस्ट्री, चाहते आणि प्रेक्षकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चित्रपटांची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने तिच्या खास मित्राच्या पत्नीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर तिनं गौरीसाठी विशेष पोस्ट लिहिली आहे.

गौरी खानला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फराह खानने तिच्या इंस्टाग्रामवर काही जुन्या सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. हे शेअर करताना फराहने मजेशीर इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हॅपी बर्थडे गौरी खान. मला बरं वाटतं की आमची सहज मैत्री माझ्या आळशीपणाशी पूर्णपणे जुळते. मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगण्याची वेगळी गरज नाही.

पहिल्या फोटोत फराह खान आणि गौरी खान सोफ्यावर बसून कॅमेरासाठी पोज देताना दिसत आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोत एक छान पार्टी एन्जॉय करत आहेत. पोस्ट शेअर होताच चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सोशल मीडिया यूजर्स किंग खानच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. फराहनं गौरीसाठी पाठवलेल्या बर्थडे शुभेच्छांच्या पोस्टचा कमेंट सेक्शन रेड हार्ट इमोजींनी भरलेला आहे.

गौरीबरोबरच फराहचे शाहरुखशीही घट्ट नातं आहे. शाहरुखने फराह खानचे कन्यादानही केलं आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान आणि फराहचा एक थ्रोबॅक व्हिडिओ देखील रेड्डीटवर व्हायरल झाला होता. फराहने 2004 मध्ये चित्रपट निर्माता शिरीष कुंदरशी लग्न केलं होतं.

शाहरुख खान आणि गौरी छिब्बर यांची मैत्री दिल्लीपासूनची आहे. दोघंही अगदी शाळेपासून एकमेकांवर प्रेम करत होते. बरीच वर्षे डेट केल्यानंतर दोघेही आपआपल्या पालकांना लग्नासाठी तयार करु शकले होते. आपल्या यशामध्ये गौरीचं मोठं योगदान असल्याचं शाहरुख नेहमी मानत आला आहे. शाहरुख आणि गौरी हे असं जोडपं आहे ज्यांचं तीन वेळा लग्न झालं आहे.

Last Updated : Oct 11, 2024, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.