ETV Bharat / entertainment

'वॉर 2'च्या मुंबईतील सेटवर फ्रेंच कॉन्सुल जनरलने घेतली हृतिक रोशनची भेट, 'आदरातिथ्याबद्दल' मानले आभार - Hrithik Roshan - HRITHIK ROSHAN

मुंबईतील फ्रान्सचे कॉन्सुल जनरल जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनी अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी 'वॉर 2' चित्रपटाच्या सेटला भेट दिली. त्याचं कामाप्रती असलेल्या समर्पणाचं कौतुक त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचा एक फोटो शेअर केला असून, हृतिकबद्दलचे गौरवउद्गारही सदिच्छेसह काढले आहेत.

French Consul General meets Hrithik Roshan
फ्रेंच कॉन्सुल जनरलने घेतली हृतिक रोशनची भेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 7:58 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टील हँडसम अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या 2019 च्या हिट चित्रपट 'वॉर'च्या सिक्वेलच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे. मुंबईतील फ्रान्सचे कौन्सुल जनरल जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनी 'वॉर 2' च्या सेटवर जाऊन त्याची भेट घेतली. हृतिक रोशनचा 'ग्रेट फॅन' असल्याचा दावा कॉन्सुल जनरलने केला असून त्यांनी या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो आता व्हायरल झालाय.

गुरुवारी संध्याकाळी एक्स या सोशल मीडियावर जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनी हृतिक रोशन बरोबरचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "मी हृतिकचा खूप मोठा चाहता आहे! त्याच्या समर्पण आणि प्रतिभेचा प्रत्यक्ष साक्षीदार झाल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. पहिल्यांदाच सेटवर भेटलो असताना 'विक्रम वेधा' स्टार यांनं दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि चित्रपटासाठी ह्रतिकला शुभेच्छा देतो."

सेटवर उपस्थित असलेले संगीतकार आणि गीतकार आरराज आनंद यांनी इंस्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केला ज्यामध्ये हृतिक, जीन-मार्क सेरे-शार्लेट आणि त्यांच्यासह फ्रेंच मुलांचा एक गट दिसत आहे. त्यांनी लिहिले, "हृतिक रोशन यांना त्यांच्या नवीन चित्रपटांच्या सेटवर भेटून नेहमीच आनंद होतो. आयन मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' ची वाट पाहत फ्रान्सचे कॉन्सुल जनरल यांनी सेटला भेट दिली. फ्रान्समधील आमचे काही तरुण मित्र आहेत ज्यांनी चित्रपटाचा आनंद आणि अनुभव पण घेतला."

अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखालील 'वॉर 2' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हृतिकला भेटल्याचा आनंद आरराज आनंद यांनी अधोरेखीत केला. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण' आणि 'टायगर 3' सारख्या पूर्वीच्या चित्रपटाच्या यशानंतर, 15 ऑगस्ट 2025 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. यशराज फिल्म्सच्या गुप्तचर विश्वातील हा सहावा चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक रोशन साऊथ स्टार ज्युनियर एनटीआर याच्या बरोबर शूटिंग करत आहे, तर अभिनेता कियारा अडवाणी देखील या चित्रपटाचा डायनॅमिक कास्टचा भाग असल्याचे समजते.

हेही वाचा -

  1. मसाबानं गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर आजी नीना गुप्ताचा आनंद गगनात मावेना - Masaba announces pregnancy
  2. ईडीने ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर राज कुंद्राची गूढ पोस्ट - Raj Kundra
  3. 'अमर सिंग चमकीला'च्या शूटिंगमध्ये परिणीतीला लाईव्ह परफॉर्म करताना पाहून पती राघव चड्ढा झाला होता दंग - Parineeti Chopra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.