ETV Bharat / entertainment

रणवीर सिंह डिप फेक व्हिडिओ प्रकरण : व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी पाठवली नोटीस - Ranveer Singh Deep fake Video

Ranveer Singh Deep Fake Video : अभिनेता रणवीर सिंह याचा डिप फेक व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह याच्या वडिलांनी सायबर सेलकडं तक्रार दाखल केली होती.

Ranveer Singh Deep Fake Video
अभिनेता रणवीर सिंह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 7:00 AM IST

मुंबई Ranveer Singh Deepfake Video : अभिनेता रणवीर सिंह डिप फेक व्हिडिओ प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलनं मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंहचे वडील जुगजीत सिंह सुंदर सिंह भावनानी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. "या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलनं नोडल सायबर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम 417, 468, 469, 471 आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला," अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली.

रणवीर सिंह डिप फेक व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल : नोडल सायबर पोलीस स्टेशन, सायबर इथं तकारदार जुगजीत सिंह सुंदर सिंह भावनानी यांनी 23 एप्रिलला तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा रणवीर सिंह हा 14 एप्रिलला एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्याची सहकारी अभिनेत्री किर्ती सेनन हिच्यासह वाराणसी शहरात गेला होता. यावेळी रणवीर सिंह याची मुलाखत घेण्यात आली. त्यानं वाराणसीमध्ये झालेल्या परिवर्तनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. त्यामध्ये त्यानं "मोदीजी का परपज यही था उनका उद्देश यही था की वो सेलिब्रेट करे आपने रिच कल्चर, हेरीटेज को, हमारी हिस्ट्री को, हमारी लेगसी को, क्युकी हम, जो भारतवर्ष है, अब मॉडर्निटी की तरफ ऐसे बढ़ रहे है, इतनी स्पीड से बढ़ रहे है. पर हमे हमारी रूटस, हमारी कल्चर हेरीटेज ये कभी नहीं भुलना चाहीये" असं कथन केलं. या व्हिडिओमधील चलचित्र जसंच्या तसं ठेवून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Al), डेटा स्वॅपिंग, मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस स्पिच ओव्हर या अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रणवीर सिंह याच्या व्हिडिओचा डिप फेक व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे, असा आरोप त्यांनी केला.

आरोपीनं बनवला डिप फेक व्हिडिओ : डिप फेक हे तंत्रज्ञान अतिशय विकसीत असल्यानं व्हिडिओ हा खरा किंवा खोटा आहे हे ओळखणं कठीण आहे. रणवीर सिंह यानं मुलाखतीमध्ये दिलेल्या व्हिडिओचं संशयीत X अकाउंट हॅन्डल धारकानं डिप फेक व्हिडिओ बनवून यामध्ये रणवीर सिंह यानं कधीही न उच्चारलेले शब्द, "मोदीजी का परपज यही है. उनका उद्देश यही था की, वो सेलिब्रेट करे हमारी दुखी हुई जीवन और डर को, हमारी बेरोजगारी को, हमारी मेहंगाई को, क्युकी हम, जो भारतवर्ष है, अब अन्यायकाल की तरफ ऐसे बढ़ रहे है, इतनी स्पीड से बढ़ रहे है, पर हमे हमारी विकास, हमारी न्याय को मांगना कभी नहीं भूलना चाहीये" "इसीलिए सोचो और मत दो जिन्हे देशकी फिक्र है, वो न्याय के लिये वोट देगा Vote for न्याय, Vote for काँग्रेस" असे बोलत असलेला डिप फेक व्हिडिओ बनवून तो 17 एप्रिल रोजी रात्री 9.23 वाजता इंटरनेटच्या माध्यमातून संशयीत एक्स अकाउंट (व्टिटर अकाउंट) हॅन्डल धारकानं सोशल मीडियावर व्हायरल केला.

रणवीर सिंहचा कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही संबंध : या डिप फेक व्हिडिओमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करुन त्यांची दिशाभूल करण्यात आली. रणवीर सिंह याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. तरी असा व्हिडिओ प्रसारित केल्यानं त्याचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या लौकीकास बाधा निर्माण करून फसवणुक केली. त्यामुळे त्यानी संशयीत एक्स अकाउंट हॅन्डल धारकाविरूद्ध कायदेशीर तक्रार दिली. तक्रारदार तकारदार जुगजीत सिंह सुंदर सिंह भावनानी यांनी महाराष्ट्र सायबर कार्यालयातील नोडल सायबर पोलीस ठाणे यांना 23 एप्रिलला दिलेल्या तकारीवरुन भारतीय दंड विधान कलम 417, 468, 469, 471 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात संशयीत व्यक्तीस नोटीस जारी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा :

  1. Look back 2022 : यंदा व्हायरल झालेल्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
  2. न्यूड फोटोशूटनंतर रणवीर सिंगने पुन्हा फोटोशूट करुन दिले द्वेष करणाऱ्यांना उत्तर
  3. BJP Marathi Dandiya festival : भाजप मराठी दांडिया महोत्सवात अभिनेता रणवीर सिंहचा धुमाकूळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.