ETV Bharat / entertainment

'फायटर'नं जगभरात 300 कोटीचा टप्पा केला पार - फायटर 300 कोटी केली कमाई

Fighter Box Office Collection Day 11 : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर' या चित्रपटानं जगभरात 300 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होत आहे.

Fighter Box Office Collection Day 11
फायटर बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 3:51 PM IST

मुंबई- Fighter Box Office Collection Day 11 : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर एरियल ॲक्शन चित्रपट 'फायटर'नं आज रिलीजच्या 12 व्या दिवसात प्रवेश केला आहे. 'फायटर' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटानं देशांतर्गत पहिल्या दिवशी 22.5 कोटीची कमाई केली. यानंतर हा चित्रपट सतत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटानं 300 कोटीचा आकडा पार केलाय. 'फायटर'नं रिलीजच्या 11व्या दिवशी 12.5 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट देशांतर्गत लवकरच 200 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री करू शकतो.

'फायटर' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिला दिवस पहिला गुरुवार- 22.5 कोटी

दुसरा दिवस पहिला शुक्रवार - 39.5 कोटी

तिसरा दिवस पहिला शनिवार - 27.5 कोटी

चौथा दिवस पहिला रविवार - 29 कोटी

पाचवा दिवस पहिला सोमवार - 8 कोटी

सहावा दिवस पहिला मंगळवार - 7.5 कोटी

सातवा दिवस पहिला बुधवार - 6.5 कोटी

आठवा दिवस दुसरा गुरुवार - 6 कोटी

पहिला आठवडा एकूण कलेक्शन - 146.5 कोटी

नववा दिवस दुसरा शुक्रवार - 5.75 कोटी

दहावा दिवस दुसरा शनिवार - 10.5 कोटी

अकरावा दिवस दुसरा रविवार - 12.5 कोटी

एकूण कलेक्शन 175.85 कोटी

'फायटर' चित्रपटाबद्दल : या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणशिवाय अक्षय ओबेराय, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर, तलत अझीझ, आमिर नाईक, संजीव चोप्रा आणि इतर कलाकार दिसणार आहेत. 'फायटर' चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलंय. हा चित्रपट 250 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित झाला आहे. 'फायटर' चित्रपट देशभक्तीने प्रेरित करणारा युद्धपट आहे. या चित्रपटामध्ये हृतिकनं स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानिया उर्फ पॅटी, दीपिका स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोड उर्फ​ मिन्नी आणि अनिल कपूर हा ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग उर्फ रॉकीच्या भूमिकेत आहे. रुपेरी पडद्यावर हृतिक आणि दीपिकानं पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. ए .आर. रहमान यांनी केले ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
  2. सारा अली खान आणि करिश्मा कपूर स्टारर 'मर्डर मुबारक'चा टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ
  3. शंकर महादेवन, झाकीर हुसैन यांना सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.