मुंबई - बॉलिवूड स्टार हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादबरोबर डेट नाईटवर स्पॉट झाला होता. मात्र यावेळीचे दृश्य नेहमीपेक्षा वेगळे होते. कारण काल रात्री हृतिक-सबा एकटे नव्हते, तर बॉलीवूडचे स्टार कपल फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्याबरोबर होते. दोन्ही स्टार्स रेस्टॉरंटमधून बाहेर येताच पापाराझींच्या कॅमेऱ्यांनी त्यांना घेरले आणि फोटो काढले. यावेळी, दोन्ही स्टार कपल्सने कॅमेऱ्यासमोर जोरदार पोजही दिल्या.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही स्टार्स कॅज्युअल लूकमध्ये ही जोडपी दिसत आहेत. हृतिक रोशनने पांढरा टी-शर्ट घातला होता ज्यावर त्याने निळ्या रंगाचे डेनिम जॅकेट घातले होते आणि ते राखाडी कार्गो पँटशी मॅचिंग केले होते. सबा आझाद ब्लॅक लूकमध्ये दिसली. फरहान अख्तर डॅपर लूकमध्ये दिसला होता. अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरने काळ्या टी-शर्टवर काळी जीन्स घातली होती, तर शिबानी अतिशय सुंदर लूकमध्ये दिसली होती. शिबानीने काळी पँट आणि वर क्रॉप केलेले ब्लू डेनिम जॅकेट घातले होते.
2011 मध्ये आलेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटापासून हृतिक रोशन आणि फरहान अख्तर यांच्यात खास मैत्री आहे. त्याचबरोबर या चित्रपटात दोन्ही स्टार्स मैत्रीचे उदाहरण देताना दिसले होते. आता फरहान अख्तरने जाहीर केले आहे की तो 'जी ले जरा' दिग्दर्शित करणार आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हृतिक रोशनच्या वर्क फ्रंटचा विचार केला तर तो आता क्रिश 4 च्या तयारीत आहे. 'क्रिश' फ्रँचायझीमधील सर्वच चित्रपट हिट झाले आहेत. आता 'क्रिश 4'मध्ये देखील प्रेक्षकांना खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये कुठली अभिनेत्री असणार, याबद्दल आतापर्यंत काहीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान हृतिक रोशनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'फायटर' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण, अक्षय ओबेरॉय, अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर, ऋषभ पंत यांसारखे स्टार्स दिसले होते. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. आता पुढं तो नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटामध्ये दिसणार आहे.
हेही वाचा -
- गरोदरपणाच्या पुस्तकात धर्मग्रंथाचं नाव वापरल्यानंतर उच्च न्यायालयानं करीना कपूरला बजावली नोटीस - kareena kapoor khan
- लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'क्रिश 4'; सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं, 'हो... तो येतोय' - Krrish 4
- शिल्पा शेट्टीनं केदारनाथ धाम आणि माँ वैष्णो देवीच्या दर्शनामधील व्हिडिओ केला शेअर, पाहा पोस्ट - Shilpa Shetty