ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार स्टारर 'खेल-खेल में'मधून फरदीन खान करणार कमबॅक - fardeen khan - FARDEEN KHAN

Fardeen Khan : अभिनेता फरदीन खान हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. त्याचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तो खूप देखणा दिसत आहे.

Fardeen Khan
फरदीन खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 11:15 AM IST

Updated : Mar 30, 2024, 12:23 PM IST

मुंबई - Fardeen Khan : अभिनेता फरदीन खाननं पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याची तयारी केली आहे. फरदीन बॉलिवूड कमबॅकसाठी त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. आता त्याचा सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्याचा नवीन लूक पाहून चाहतेही आश्चर्यचकित होत आहेत. आता 14 वर्षांनंतर फरदीन खान चित्रपटसृष्टीत कमबॅक करणार आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' या चित्रपटात फरदीन खान दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्टही समोर आली आहे. फरदीन खान शेवटी 'दुल्हा मिल गया' (2010) चित्रपटात दिसला होता.

'खेल खेल में'ची स्टारकास्ट : अक्षय कुमार आणि तापसी पन्नू स्टारर 'खेल-खेल में' चित्रपटात वाणी कपूर, आदित्य सील, पंजाबी गायक आणि अभिनेता एमी वर्क आणि प्रज्ञा जैस्वाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुदस्सर अझीझ यांनी केलं आहे. टी-सीरीजचे मालक भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, शशी सिन्हा आणि अजय राय हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नाही. मात्र लवकरच या चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा केली जाणार अशी अपेक्षा केली जात आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता.

फरदीन खान बद्दल : फरदीन खाननं 1998मध्ये ‘प्रेम अगन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर तो 'जंगल', 'प्यार तूने क्या किया', 'प्यार के लिए कुछ भी करूंगा', 'हम हो गये आपके', 'कुछ तुम कहो कुछ हम', 'ओम जय जगदीश', 'खुशी', 'भूत', 'कितने दूर कितने पास', 'जानशीन', 'देव', 'फिदा', 'नो एंट्री', 'शादी नंबर 1', 'एक खिलाडी एक हसीना', 'प्यारे मोहन', 'आर्यन', 'जस्ट मॅरीड', 'है बेबी', 'डार्लिंग', 'जय वीरू', 'लाइफ पार्टनर', 'ऍसिड फॅक्टरी', 'ऑल द बेस्ट' आणि 'दुल्हा मिल गया' मध्ये काम केलं. 14 वर्षांनंतर तो पुन्हा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे. याशिवाय तो ‘विस्फोट’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहे. या चित्रपटावर सध्या काम सुरू आहे.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर आज स्ट्रीमिंग होईल, पाहा प्रोमो - the great indian kapil show
  2. चोप्रा भगिनींच्या प्रेमाला उधाण! मन्नाराच्या बर्थडे पार्टीला निक जोनाससह प्रियांकाची हजेरी - Mannara Chopra Birthday Bash
  3. मलायकाचा मुलगा अरहानच्या वाढदिवसाला अरबाज नवी पत्नी शशुरा खानसह हजर - ARHAAN KHAN BIRTHDAY PARTY

Last Updated : Mar 30, 2024, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.