ETV Bharat / entertainment

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी'मधील पुरुष पात्रांचा फर्स्ट लूक रिलीज - Heeramandi The Diamond Bazaar - HEERAMANDI THE DIAMOND BAZAAR

Heeramandi The Diamond Bazaar : फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन आणि ताहा शाह यांच्या भूमिका असलेल्या संजय लीला भन्साळीच्या 'हिरामंडी: द डायमंड बझार' या वेब सीरीजमधील फर्स्ट लूक समोर आला आहे. ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Heeramandi The Diamond Bazaar
हिरामंडी: द डायमंड बझार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 3:01 PM IST

मुंबई- Heeramandi The Diamond Bazaar : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या आगामी 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरीजमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच या मल्टीस्टारर वेब सीरीजमधील 'तिलस्मी बहन' हे दुसरे गाणे रिलीज झालं होतं. आता या वेब सीरीजमधून एक शॉकिंग सरप्राईज समोर आलं आहे. गेल्या 14 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टी सोडल्यानंतर फरदीन खान 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरीजमधून पुनरागमन करत आहे. आता या वेब सीरीजमधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. व्हायरल झालेल्या पोस्टर्समध्ये अभिनेता शेखर सुमन दिसत आहे. या चित्रपटात तो झुल्फिकारच्या भूमिकेत दिसणार आहे.

'हिरामंडी: द डायमंड बाजार' वेब सीरीजमधील मेल स्टारकास्ट : यानंतर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये शेखर सुमनचा मुलगा अध्यायन सुमन दिसत आहे. या वेब सीरीजमध्ये तो जोरावरची भूमिका साकारणार आहे. तसेत ताहा शाहा 'हीरामंडी: द डायमंड बाजार' मध्ये ताजदारच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय एका पोस्टरमध्ये फरदीन खान हा दिसत आहे. तो या वेब सीरीजमध्ये वली मोहम्मदच्या भूमिकेत झळकणार आहे. फरदीन हा शेवटी 'दुल्हा मिल गया' (2010) या चित्रपटात दिसला होता. ही वेब सीरीज खूप दिवसांपासून चर्चेत आहे. 'हिरामंडी: द डायमंड बाजार' चित्रपट 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हीरामंडी - द डायमंड बझार वेब सीरीजबद्दल : मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि रिचा चढ्ढा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी - द डायमंड बझार या वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. संजय भन्साळी वेब सीरीजद्वारे सर्वांना एका जादुई दुनियेत घेऊन जाणार आहेत. 1940च्या दशकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ही वेब सीरीज वेश्या आणि त्यांच्या ग्राहकांच्या कहाणीभोवती फिरणारी आहे. याआधी संजय लीला भन्साळी यांनी 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट देखील वेश्याच्या आयुष्यावर आधारित होता. 'गंगूबाई काठियावाडी' 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला होता.

हेही वाचा :

  1. प्रेमिकांच्या चेहऱ्यासमोरील पुस्तकं हटली, चेहरे पाहून चुकले चाहत्यांचे सर्व अंदाज - PYAR KE DO NAAM MOVIE
  2. टायगर श्रॉफने उघडले सेलेब्रिटी फिटनेस सेंटर, एक्स दिशा पटानीनं लावली नव्या बॉयफ्रेंडबरोबर हजेरी - Tiger Shroff fitness center
  3. 'द गोट लाइफ'ने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर गाठला 100 कोटींचा टप्पा, जाणून घ्या 10व्या दिवसाची कमाई - THE GOAT LIFE

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.