ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2' चा टीझर : अल्लु अर्जुनचा थक्क करणारा अवतार पाहून चाहते झाले दंग - Pushpa 2 Teaser - PUSHPA 2 TEASER

Pushpa 2 Teaser: अल्लू अर्जुनचे चाहते आणि सिने रसिक 'पुष्पा 2' च्या टीझरची प्रतीक्षा आतुरतेनं करत होते. त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त टीझरचं लॉन्चिंग करण्यात आलं. त्याच्या आक्रमक अवतारानं चाहत्यांना थक्क करुन सोडलं आहे.

Pushpa 2 Teaser
'पुष्पा 2' चा टीझर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 12:29 PM IST

मुंबई - Pushpa 2 Teaser: आज अल्लू अर्जुनच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज झाला आहे. 'पुष्पा 2' च्या टीझरच्या रिलीजने चाहते आणि चित्रपट प्रेमींना वेड लावलंय. टीझर 2021 मध्ये त्याच्या पूर्वीच्या 'पुष्पा: द राइज' प्रमाणेच प्रेक्षकांना आकर्षित करण्याची खात्री देत आहे.

'पुष्पा 2' च्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन एका आक्रमक, साहसी महिलेच्या आकर्षक अवतारात दिसला आहे. त्याच्या उग्र रूपामुळे अनेक चाहत्यांनी त्याची तुलना देवी कालीशी केली आहे. त्याचा हा अवतार गंगाम्मा देवतेपासून प्रेरित असल्याचं तेलुगू चाहत्यांनी म्हटलंय. या अवताराची पारंपरिक पूजा तिरुपतीमध्ये मे महिन्यात भरणाऱ्या जत्रेमध्ये केली जाते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सुकुमारचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच या अवताराचं कारण स्पष्ट होईल. 'पुष्पा 2' च्या टीझरमधील अल्लू अर्जुनचा भयंकर अवतार मास अपील करणारा आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर लगेचच, उत्साही चाहत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'पुष्पा 2: द रुल'चे "मास ब्लॉकबस्टर" म्हणून स्वागत केल्याचं दिसतंय.

गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना "पुष्पा कुठे आहे?" या शीर्षकाची झलक पाहायला मिळाली होती. 'पुष्पा 2' चा या वर्षी अधिकृत टीझर रिलीज झाल्यामुळे उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. याआधी, निर्मात्यांनी 'पुष्पा मास जत्रा' नावाची प्रचारात्मक मोहीम सुरू केली होती. दररोज मनोरंजक पोस्टर्स उघड करून 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी टीझरच्या लाँचची तयारी करण्यात आली होती.

'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जुन पुष्पराजच्या भूमिकेत परत येतो. यामध्ये रश्मिका मंदान्ना त्याची पत्नी श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनची व्यक्तिरेखा फहद फासिल बरोबर निकराचा संघर्ष करताना दिसणार आहे. याच्या पहिल्या भागात त्यानं IPS अधिकारी भंवर सिंग शेखावत ही भूमिका साकारली होती.

सुकुमार दिग्दर्शित आणि श्रीकांत विसा लिखीत 'पुष्पा 2: द रुल' हा एक भव्य स्केलवर बनलेला चित्रपट आहे. मैत्री मुव्हीज मेकर्सने याची निर्मिती केली आहे. अ‍ॅक्शनने भरलेला हा सिक्वेल १५ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, तो बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'शी स्पर्धा करताना दिसेल. सध्या ती 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलल्या जातील अशी चर्चा आहे.

हेही वाचा -

  1. फिल्म इंडस्ट्रीतील उदयासह अधिराज्य गाजवणारा प्रतिभावान पॉवरहाऊस स्टार अल्लू अर्जुन - Allu Arjun Birthday
  2. 'मिर्झापूर 3' 'मुन्ना भैया' दिव्येंदूनं केला खुलासा, नवीन हंगामाचा नसणार भाग - Mirzapur 3
  3. मराठी कलावंतांचा गुढीपाडवा 'चिरायू'; 17 वर्षांपासून सुरू आहे उपक्रम - GUDIPADwA 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.