ETV Bharat / entertainment

विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरच्या आगामी 'द फॅमिली स्टार'च्या पहिल्या गाण्याची झलक - द फॅमिली स्टार

The Family Star song promo : विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांनी त्यांच्या आगामी 'द फॅमिली स्टार' चित्रपटातील पहिल्या गाण्याचा प्रोमो शेअर केला आहे. परशुराम लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

The Family Star song promo
द फॅमिली स्टार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 12:08 PM IST

मुंबई - The Family Star song promo : परशुराम पेटला दिग्दर्शित 'फॅमिली स्टार' या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील पहिले गाणे, 'नंदा नंदना'ची एक झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. सिद श्रीराम यांनी गायलेलं हे गीत गोपी सुंदर यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्याचे संपूर्ण व्हर्जन 7 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. गाणे रिलीज होण्यापूर्वी, चित्रपटाचे मुख्य कलाकार मृणाल ठाकूर आणि विजय देवरकोंडा यांनी सोमवारी रात्री 'नंद नंदना' या आगामी ट्रॅकचा गीतात्मक प्रोमो शेअर केला.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

विजय देवरकोंडा-मृणाल ठाकूर यांच्या कौटुंबिक भावनिक प्रेम नाट्यातील या गाण्याच्या प्रोमोने गाणे आणि चित्रपट या दोन्हीबद्दलच्या अपेक्षा वाढवली आहे. परशुराम लिखित आणि दिग्दर्शित 'द फॅमिली स्टार' यावर्षी 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. फॅमिली स्टार बनवण्यापूर्वी दिग्दर्शक परशुरामने महेश बाबू स्टारर 'सरकारू वारी पाता' चित्रपटानंतर बराच वेळ विश्रांती घेतली. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय सौंदर्यवतींपैकी एक असलेल्या मृणाल ठाकूर हिच्यासह विजयचा पहिला चित्रपट आहे.

विजय आणि मृणाल व्यतिरिक्त, या कौटुंबिक रोमँटिक-अ‍ॅक्शन ड्रामामध्ये दिव्यांशा कौशिक, अजय घोष आणि अबीगेल स्कोबी प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. विजयचे चाहते 'फॅमिली स्टार'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा अलिकडे रिलीज झालेल्या 'खुशी' चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि त्यापूर्वी त्याचा हिंदी पदार्पणाचा 'लायगर' हा चित्रपट फ्लॉप झाला होता. आता त्याला आपल्या कारकिर्दीवर लागलेला हा डाग पुसून टाकायचा आहे. 'द फॅमिली स्टार' चित्रपटाचे छायांकन के.यू. मोहनन यांनी केलं आहे तर मार्तंड के व्यंकटेश यांनी संकलन आणि कला दिग्दर्शन ए.एस. प्रकाश यांचे आहे. हा चित्रपट दिल राजू आणि सिरिश यांनी बनवला आहे.

विजयच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, अभिनेता गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित अ‍ॅक्शन ड्रामा 'VD 12' मध्ये देखील दिसणार आहे. अभिनेता विजय देवराकोंडा दिग्दर्शक नाग अश्विनच्या सायन्स फिक्शन थ्रिलर 'कल्की 2898 एडी'मध्ये प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानीसह एक छोटीशी भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा -

  1. अ‍ॅनिमल दिग्दर्शकाने मला कास्ट केलं तर त्याचा माचो हिरो स्त्रीवादी होईल, कंगना रणौतची प्रतिक्रिया
  2. वयाच्या 13व्या वर्षी वडील गमावले, केवळ 25 रुपये होती पहिली कमाई! अशा घडल्या 'गानसम्राज्ञी' लता मंगेशकर
  3. रजनीकांत स्टारर 'लाल सलाम'चा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.