मुंबई - TRIPTII DIMRI HOLLYWOOD DREAMS : बॉलिवूडची सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती दिमरी सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'बॅड न्यूज' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. तिनं हॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तिच्या महत्त्वाकांक्षेबद्दल खुलासा केला आहे. ती पाश्चात्य सिनेमांमधील संधी शोधण्यात मदत करणाऱ्या एजंटच्या शोधात आहे. ती किरकोळ भूमिका स्वीकारण्यासही तयार आहे. कारण याकडे ती करिअरच्या प्रगतीमध्ये एक पायरी म्हणून पाहात आहे.
एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीनं पाश्चात्य चित्रपटांसाठी ऑडिशन देण्याच्या तिची इच्छा बोलून दाखवली. या फिल्म इंडस्ट्रीतील कालाकारांनी आत्मसात केलेल्या अभिनय पद्धतीचा तिला हेवा वाटतो. तिनं सांगितलं की, "मला कुठेतरी एक छोटासा भाग मिळाला तरी, मला वाटते की ते खरोखर उपयुक्त ठरु शकतं, कारण मला तिथील कलाकारांची काम करण्याची पद्धत खूप आवडते."
तृप्तीच्या आगामी चित्रटांबद्दल बोलायचं तर, ती लवकरच 'भूल भुलैया 3' मध्ये रुपेरी पडद्यावर झळखणार आहे. हा याच शीर्षकाच्या हॉरर-कॉमेडी फ्रँचायझीचा नवीन भाग आहे. या चित्रपटामध्ये ती कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्याबरोबर काम करत आहे. याव्यतिरिक्त, ती सिद्धांत चतुर्वेदी याच्या बरोबर मुख्य भूमिका असलेल्या 'धडक 2' मध्ये भूमिका करत आहे. धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि शाझिया इक्बाल दिग्दर्शित या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे आणि 22 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. तिच्याकडे 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' आणि 'अॅनिमल पार्क' यासह इतर प्रोजेक्ट देखील आहेत.
तृप्ती दिमरी 'पुष्पा 2 द रुल'च्या आयटम नंबरमध्ये अल्लू अर्जुनबरोबर तिची जादू दाखवणार आहे. 'पुष्पा द राइज'मधील 'ऊ अंतवा' हे गाणं खूप हिट झालं होतं, या गाण्याचा प्रचंड क्रेझ होती. 'ऊ अंतवा' गाण्यात सामंथानं धमाकेदार डान्स केला होता. त्यामुळे हे गाणं तिच्या कारकिर्दीला एका उंचावर नेऊ शकतं असा विश्वास तिच्या चाहत्यांसह पुष्पाच्या निर्मात्यांनाही आहे.