हैदराबाद : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा मोठा अपघात झाला आहे. 'गोदाचारी 2' या तेलुगू चित्रपटाचं शूटिंग करत असताना तो जखमी झाला. इमरान हाश्मीच्या मानेवर जखम झालीय. शूटिंगदरम्यान त्याचा अपघात झाला असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'गोदाचारी 2' चित्रपटाच्या सेटवर अपघात : इमरान हाश्मी 'गोदाचारी 2' या तेलुगू चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्याच्यासोबत हा अपघात झाला. या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत अदिवी शेष दिसणार आहे. समोर आलेल्या माहितीनूसार,, इमरानला ही दुखापत एक ॲक्शन सीन करताना झाली. 'ओझी' या तेलुगू चित्रपटानंतर 'गोदाचारी 2' हा इमरानचा दुसरा तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथचा सुपरस्टार अदिवी शेषही दिसणार आहे.
इमरान हाश्मीचे चित्रपट : इमरान हाश्मीनं 2002 मध्ये 'फूटपाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याला 'मर्डर' (2004) या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यानं 'मर्डर 2', 'जन्नत', 'आशिक बनाया आपने', 'राज 3', 'आवारापन', 'हमारी अधुरी कहानी', 'जेहर', 'जन्नत 2', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' 'टायगर 3' आदी चित्रपटांमध्ये काम केलं.
चाहते घाबरले : सध्या हैदराबादमध्ये 'गोदाचारी 2' चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. ॲक्शन सीन शूट करत असताना अपघात झाला आणि अभिनेता इमरान जखमी झाला. इमरान हाश्मीच्या जखमांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहते घाबरले असल्याचं त्यांच्या कमेंटमधून दिसून येत आहे. फोटोत त्याच्या मानेवर थोडासा कट दिसत आहे ज्यातून रक्तस्त्राव होत असल्याचं दिसत आहे. अभिनेता लवकर ठीक होण्याची प्रार्थना काही चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.
हेही वाचा