ETV Bharat / entertainment

गोड बातमीची घाई झालेल्या सर्वांसाठी 'एक दोन तीन चार', पाहा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर - Ek Dok Thien Char trailer - EK DOK THIEN CHAR TRAILER

Ek Dok Thien Char trailer : घरात पाळणा हलणार ही बातमी सर्वांसाठीच आनंदाची आणि कौतुकाची असते. मुलं जर जुळी किंवा तिळी होणार असतील तर ही बातमी नातेवाईकांमध्ये वाऱ्यासारखी पसरते. पण चार मुलं जर गर्भवतीच्या पोटात वाढत असतील तर त्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया काय असू शकतील याची धमाल कथा 'एक दोन तीन चार'मध्ये पाहायला मिळणार आहे.

Ek Dok Thien Char trailer
एक दोन तीन चार ट्रेलर रिलीज (Ek Dok Thien Char PR team)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 4:49 PM IST

मुंबई - Ek Dok Thien Char trailer : प्रेम, लग्न, बाळंतपण आदी गोष्टींचं तरुणाईला अप्रूप वाटत असलं तरी जेव्हा प्रत्यक्षात ते अनुभवण्याची पाळी येते तेव्हा त्यांच्यावर गांगरून जाण्याची वेळ येते. आजच्या युगातील नव्या जोडप्यांची कथा आणि संघर्ष दाखवणारा चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे 'एक दोन तीन चार' जो सादर केला आहे जिओ स्टुडिओजने आणि वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा एक धमाल चित्रपट असून, 'एक दोन तीन चार' मधून वैदेहीला चार बाळं की, सहा बाळं होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

आधुनिक जोडप्यांची कथा आणि संघर्ष दाखवणारा 'एक दोन तीन चार' या चित्रपटाचा रंगतदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधून समीर आणि सायली यांच्या प्रेमकथेचे आनंदी आयुष्य कसे रोलरकोस्टर प्रवासासारखे विविध वळणं घेते याचा अंदाज येतो. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी समीर आणि सायलीचे लग्न होते आणि लगेचच गोड बातमी येते. या गोड बातमीमुळे त्यांची तारांबळ कशी उडते हे पाहणे मजेदार ठरणार आहे. ट्रेलर बघताना असे वाटते की त्यांना एक नाही, दोन नाही, तर चार मुलं होणार आहेत. पण शेवटी वैदेहीने सहा बाळांची बातमी देऊन प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

'मुरांबा‘ चे दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांचा पुढील चित्रपट कधी येणार अशी विचारणा होत होती. ती प्रतीक्षा संपली असून त्यांनी दिग्दर्शित केलेला 'एक दोन तीन चार' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग अभिनित 'सिम्बा' या हिंदी चित्रपटात वैदेही परशुरामी महत्वपूर्ण भूमिकेत होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'इश्क विश्क रीलोडेड' या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी ने केले होते. हे दोन्ही मराठमोळे कलाकार 'एक दोन तीन चार' या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी सोबत मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इत्यादी कलाकार या कथेतील कुटुंबाचा भाग असणार आहेत. तसेच सोशल मीडिया स्टार्स करण सोनावणे अभिनेता म्हणून आणि यशराज मुखाटे संगीतकार म्हणून या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मित बहावा एंटरटेनमेंट आणि १६ बाय ६४ यांच्या सहकार्याने 'एक दोन तीन चार' हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.