ETV Bharat / entertainment

Ed Sheeran And Diljit Dosanjh: एड शिरीननं दिलजीत दोसांझबरोबर स्टेजवर गायलं पंजाबी गाणं, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का - Ed Sheeran Diljit Dosanjh

Ed Sheeran and Diljit Dosanjh: जगप्रसिद्ध गायक एड शिरीननं पंजाबी गायक दिलजीत दोसांझबरोबर एकाच मंचावर गाण गायलं आहे. दोघांचे गाण्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एडनं पंजाबी गाणं गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Ed Sheeran and Diljit Dosanjh
एड शीरन आणि दिलजीत दोसांझ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 10:19 AM IST

मुंबई - Ed Sheeran and Diljit Dosanjh : जगप्रसिद्ध गायक एड शिरीनचा गेल्या शनिवारी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर लाईव्ह कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमध्ये त्यानं पंजाबी गायक दिलजीत दोसांझबरोबर स्टोज शेअर केला होता. या दोघांनीही लाइव्ह कॉन्सर्टमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यानंतर चाहत्यांनी भरभरून दाद दिली. हा कॉन्सर्ट एड शिरीनच्या आशिया आणि युरोप दौऱ्यामधील एक भाग आहे. कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांसाठी एड शिरीनची परफॉर्मन्स एक मोठी ट्रीट असल्याचं आता दिसत आहे.

एड शिरीननं गायलं पंजाबी गाणं : या व्हिडिओमध्ये दिलजीत दोसांझबरोबर एड शिरीननं पंजाबीमध्ये चार्ट-बस्टिंग ट्रॅक 'लव्हर' गाणं गाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दिलजीतच्या टीमनं स्टेज परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. याआधीदेखील दिलजीतनं काही व्हिडिओ शेअर केले होते. यात तो एड शिरीनला भेटताना दिसला होता. एड शिरीनच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री माधुरी दीक्षित, दिग्दर्शक-कोरियोग्राफर फराह खान आणि अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत यांचा समावेश होता. या शोचे प्रमोशन बुक माय शोनं केलं होतं. या शोमध्ये अनेक चाहत्यांनीदेखील हजेरी लावली होती. हा कार्यक्रम खूप भव्य असल्यानं सध्या सोशल मीडियावर या कॉन्सर्टची चर्चा होत आहे.

फराह खाननं एड शिरीनसाठी दिली पार्टी : याआधी शुक्रवारी रात्री फराह खाननं मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एड शिरीनसाठी एक भव्य पार्टी दिली होती. यामध्ये हृतिक रोशनपासून ते दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तर आणि माधुरी दीक्षितपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीसाठी आले होते. या पार्टीमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान दिलजीत दोसांझच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'कनेडा' या चित्रपटामध्ये दिसला होता. यापुढं तो 'अमर सिंह चमकीला' आणि 'क्रू' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Upasana meets President : राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला यांनी घेतली राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट
  2. Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नातील फोटो व्हायरल
  3. राम चरणानंतर 'गेम चेंजर'मधील कियारा अडवाणीचा लूक लीक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.