मुंबई - बिग बॉस फेम टीव्हीचे प्रसिद्ध चेहरे शिव ठाकरे आणि अब्दु रोजिक यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झलक दिखला जा 11 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये विजयाची तयारी केल्यानंतर शिव ठाकरेच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, मनी लाँड्रिंग प्रकरणी इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने शिव ठाकरेला समन्स पाठवले आहे.
त्याचबरोबर अब्दू रोजिक यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण लॉर्ड अली असगर शिराझीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी शिव ठाकरे आणि अब्दु यांनी आपले म्हणणे यापूर्वीच नोंदवण्यात आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? - मीडिया रिपोर्ट्सनुसार, अली असगर शिराझीची कंपनी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड अनेक उद्योगांना आर्थिक मदत करते. यामध्ये शिव ठाकरे यांचे रेस्टॉरंट ठाकरे फूड अँड स्नॅक्स रेस्टॉरंट आणि अब्दु रोजिक याचे बुर्गीर रेस्टॉरंट यांचा देखील समाविष्ट आहे. विशेष सांगायचे तर शिराझी यांच्या कंपनीने नार्कोच्या मदतीने फंडिंग केले होते. त्याचवेळी शिराझीचा नार्कोमध्ये सहभाग झाल्यानंतर शिव आणि अब्दू यांनी त्याच्याबरोबरचा करार संपुष्टात आणला असून आता ईडीने दोघांनाही साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी बोलावले आहे.
शिव ठाकरे आणि अब्द रोजिक यांची प्रतिक्रिया - ईडीच्या समन्सनंतर बिग बॉसच्या या दोन चेहऱ्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिव ठाकरे हा मराठी बिग बॉसचा विजेता आहे आणि सलमान खानच्या बिग बॉस 16 मध्ये तो फर्स्ट रनर अप बनला होता. अब्दु रोजिकही बिग बॉसमध्ये आला आणि त्याला भरपूर प्रसिद्ध मिळाली आहे.
कोण आहे अब्दू रोजिक? - बिस बॉस शोमध्ये अब्दू उर्फ छोटा भाईजानला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आणि त्यानेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मुळचा ताजिकिस्तानचा असलेला अब्दू एक प्रसिद्ध गायक, संगीतकार तसेच ब्लॉगर आणि बॉक्सर देखील आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात तरुण गायक होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
हेही वाचा -