ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर मद्यधुंद हनी सिंगनं झहीर इक्बालला दिला इशारा - HONEY SINGH - HONEY SINGH

Honey Singh and Zaheer Iqbal : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे लग्नबंधनात अडकले आहेत. दरम्यान, त्यांच्या रिसेप्शनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यात हनी सिंग झहीर इक्बालला इशारा देताना दिसत आहे.

Honey Singh and Zaheer Iqbal
हनी सिंग आणि झहीर इक्बाल (हनी सिंग (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 3:31 PM IST

मुंबई - Honey Singh and Zaheer Iqbal : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून रोजी त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांच्यावर आता लग्नाच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. या लग्नाला अनेक बॉलिवूडमधील कलाकार उपस्थित होते, त्यापैकी एक सर्वात लोकप्रिय रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग देखील यावेळी स्पॉट झाला. हनी सिंगनं त्याची बेस्ट फ्रेंड सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचा खूप आनंद लुटला आणि बरीच गाणीही गायली. याशिवाय त्यानं सोनाक्षीचा पती झहीरला एक इशारा दिला आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या हनी सिंगनं लावली हजेरी : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हनी सिंगला, जेव्हा पापाराझीनं विचारलं, तेव्हा हनी सिंगनं सांगितले की, "एका वर्षानंतर सोनाक्षीच्या लग्नात त्यानं खूप मद्यपान केलं. माझ्या आईला कळले तर ती मला खूप मारेल." यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "मी सोनाक्षी सिन्हासाठी खूप आनंदी आहे आणि झहीर इक्बाल खूप चांगला माणूस आहे. जर झहीरनं सोनाक्षीला खूश ठेवले नाही तर मी त्याला बघून घेईन.," असं त्यानं मस्करी करत म्हटलं.

हनी सिंग नुकताच लंडनहून त्याच्या नवीन गाण्याच्या शूटिंगनंतर त्याची बेस्ट फ्रेंड सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. त्यानं लग्नापूर्वी एक पोस्ट देखील शेअर केली होती. यात सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान, हनीनं आपल्या पोस्टद्वारे तिच्या लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला होता. हनी सिंगनं म्हटलं होत की, तो त्याच्या खास मित्राच्या लग्नाला नक्की येईल. आता हनी सिंगच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. त्याचा व्हिडिओमधील अंदाज अनेकांना आवडला आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूप खुश होऊन त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. हनी सिंगचं लवकरच दुसर गाणं लॉन्च होणार आहे.

हेही वाचा :

  1. ॲटलीच्या मास ॲक्शन चित्रपटात सलमान खान आणि रजनीकांत दिसणार एकत्र - SALMAN KHAN AND RAJINIKANTH
  2. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये रणवीर शौरीनं यूट्यूबर लवकेश कटारियाला दिलं नवीन नाव... - ranvir shorey
  3. सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बालच्या रिसेप्शनला अवतरलं तारांगण, सलमान खानची दिमाखदार एन्ट्री - SONAKSHI ZAHEER WEDDING

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.